तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Oct
Follow

नवरात्रोत्सवात काशीफळ वेधतेय लक्ष

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवरील महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत विविध फळे, भाजीपाला व अन्य शेतमालाची मोठी आवक-जावक सुरू असते. अलीकडे कांद्याचे मोठे मार्केट येथे विकसित झाले आहे. डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू आदींचीही उल्लेखनीय उलाढाल या बाजार समितीत पाहण्यास मिळते. सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू आदी फळांची आवक वाढली आहे. त्यांचे दरही वधारले आहेत. पण त्याबरोबर या काळात देवीपूजेत सर्वाधिक महत्त्व असलेल्या काशीफळाला (डांगर) मोठी मागणी आहे. नवरात्रीच्या उपवासात तो आवर्जून खाल्ला जातो.


35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor