ऑनलाइन नोंदणीमध्ये जालना जिल्हा राज्यात अव्वल
राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषिपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. महावितरणच्या या वेबसाइटला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. चौदा दिवसांत राज्यातून १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे. या नोंदणीत जालना जिल्हा सर्वांत पुढे असून, जिल्ह्यातून ५२ हजार ६७ अर्ज दाखल झाले आहेत. शासनाने मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा. यासाठी महावितरणने वेबसाइट तयार केली. तिचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी मुंबईत झाले होते. त्यानंतर केवळ १४ दिवसांत राज्यातील १ लाख २२ हजार ४२१ शेतकऱ्यांनी वेबसाइटवर अर्ज दाखल केले आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor