तपशील
ऐका
तण
कृषी
भेंडी
कृषी ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
5 Jan
Follow

भेंडी पिकात असे करा तण व्यवस्थापन! (Okra crop weed management!)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भेंडीचे पीक उष्णकटिबंधीय तसेच उप-उष्णकटिबंधीय प्रदेश आणि उष्ण भागात घेतले जाते. भेंडी परदेशात निर्यातीसाठी उत्कृष्ट बाजारपेठ देते. महाराष्ट्रातील देखील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात भेंडीची लागवड केली जाते. भेंडीला बाजारात वर्षभर चांगली मागणी असल्यामुळे या पिकापासून किफायतशीर उत्पन्न मिळविता येते. तथापि, पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी, पिकाची काळजी घेणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. भाजीपाला पिकांत तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पीक आणि तण यांच्या विविध पोषक घटकांसाठी स्पर्धा होते. पिकास वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पोषक घटकांचा पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्याने उत्पादनात घट येते. लागवडीनंतर पीकवाढीच्या सुरुवातीचा एक तृतीयांश काळ हा पिकला अतिसंवेदनशील मानला जातो. या काळात पीक तणविरहित ठेवणे आवश्यक असते. भेंडी पिकाचा संवेदनशील काळ हा लागवडीनंतर 15 ते 30 दिवस व उत्पन्नातील घट 40 ते 50 टक्के एवढी असते म्हणूनच आजच्या या लेखात आपण भेंडी पिकातील तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

भेंडी पिकात आढळणारी तणे (Weeds in Okra) :

1) खरीप हंगाम:

तांदुळजा, रेशीमकाटा, नागरमोथा, केना, कोंबडा, हराळी, माका, सावन, जंगली राई, आणि हजारदाणी व इत्यादी.

2) रब्बी हंगाम:

रानकांदा, चंदनबटवा, हराळी, नागरमोथा, दुधी, रानवांगी इ.

एकात्मिक तणनियंत्रण पद्धती:

प्रतिबंधात्मक उपाय:

  • शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.
  • पीक पेरणीपूर्वी शेतात उगवलेली तणे काढून टाकावीत.
  • पेरणीसाठी तणविरहित बियाणे वापरावे.
  • शेतात तणांची कमीत कमी उगवण होईल याकडे लक्ष देणे. त्यामुळे कीड-रोगांच्या पुढील प्रसारास आळा बसेल.
  • पाण्याचे पाट, शेतातील बांध, कंपोस्ट खड्डे इत्यादी जवळ तण उगवणार नाही याची काळजी घ्यावी.
  • उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावे.
  • शक्य असल्यास आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

मल्चिंग तंत्राने तण व्यवस्थापन:

  • मल्चिंग ही शेतातील तण नियंत्रणाची प्रगत पद्धत आहे.
  • मल्चिंग म्हणजे शेतात लावलेल्या झाडांच्या मातीला चारही बाजूंनी प्लास्टिकचे आच्छादन लावणे. या तंत्रामुळे पीक दीर्घकाळ तणांपासून सुरक्षित राहते.

तण व्यवस्थापन तंत्र:

  • कुदळाच्या साहाय्याने वेळोवेळी तण काढणे ही पिकातील तण नियंत्रणाची सर्वात पारंपारिक आणि प्रभावी पद्धत आहे.
  • बियाणे पेरताना बियाण्याकडे लक्ष द्या व बियांमध्ये भेसळयुक्त गवती बियाणे टाळा.
  • पेरणीनंतर 30 दिवसांच्या आत किंवा ठराविक अंतराने शेतातील तण काढणे आवश्यक आहे.
  • शेतात बियाणे उगवण्यापूर्वी तण नियंत्रणासाठी पेंडीमेथालिन 30% ईसी (युपीएल-दोस्त) 1 लिटरची 400 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी. पेंडीमेथालिनच्या फवारणीनंतर निंदणी व कोळपणी सहा आठवड्यांनी करावी.
  • पैराक्वाट डाइक्लोराइड 24% एसएल (देहात-चॉपऑफ) चा उपयोग शेतातील तणांची संख्या कमी करण्यासाठी, एकतर ब्रॉडकास्ट स्प्रे म्हणून किंवा भेंडीच्या लागवडीपूर्वी उगवलेल्या आणि वाढणाऱ्या तणांवर उपचार म्हणून केला जाऊ शकतो.


तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी:

  • विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके योग्य प्रमाणात वापरावीत.
  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
  • फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
  • चॉपऑफसारखे बिन निवडक तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 21 दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
  • तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
  • उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.
  • उगवणीपूर्व फवारणी पेरणी दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये. उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी.
  • फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी.
  • तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.

तुम्ही भेंडी पिकाचे तणांपासून कशा प्रकारे संरक्षण करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भेंडी पिकामध्ये आढळणारे तण कोणते?

भेंडी पिकामध्ये खरीप हंगामात आढळणारे तण:

तांदुळजा, रेशीमकाटा, नागरमोथा, केना, कोंबडा, हराळी, माका, सावन, जंगली राई, आणि हजारदाणी व इत्यादी.

भेंडी पिकामध्ये रब्बी हंगामात आढळणारे तण:

रानकांदा, चंदनबटवा, हराळी, नागरमोथा, दुधी, रानवांगी इ.

2. भेंडी पिकासाठी उपयुक्त हवामान कोणते?

भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे. समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान हे भेंडी पिकासाठी उपयुक्त असते.

3. भेंडी पिकामध्ये आढळणाऱ्या प्रमुख किडी व रोग कोणते?

भेंडी पिकामध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणारी अळी, भुरी आणि केवडा हे प्रमुख रोग व किडी आढळून येतात.

40 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor