तपशील
ऐका
भेंडी
कीटक
कृषी ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
30 Apr
Follow

भेंडी फळ पोखरणारी कीड : लक्षणे आणि व्यवस्थापन (Okra Fruit Borer: Symptoms and Management)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

भेंडीचे पीक उष्णकटिबंधीय तसेच उप - उष्णकटिबंधीय प्रदेश आणि उष्ण भागात घेतले जाते. भेंडी परदेशात निर्यातीसाठी उत्कृष्ट बाजारपेठ देते. भेंडीचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये असून, भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील देखील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी - जास्त प्रमाणात भेंडीची लागवड केली जाते. भेंडीला बाजारात वर्षभर चांगली मागणी असल्यामुळे या पिकापासून किफायतशीर उत्पन्न मिळविता येते. भेंडीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रेसर आहे. महाराष्ट्रात भेंडी पिकावर विविध प्रकारच्या किडी व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणारी अळी, भुरी, केवडा यांचा समावेश आहे. आजच्या आपल्या या लेखात यापैकीच एका महत्वपूर्ण अशा फळ पोखरणाऱ्या किडी विषयीची माहिती, लक्षणे आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भेंडी पिकामध्ये फळ पोखरणारी अळी ही सर्वांत नुकसानकारक कीड आहे. ही कीड वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता व जास्त उष्ण तापमान या किडीला पोषक असते. भेंडी पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होऊ शकते. ही बहुभक्षी कीड असून भेंडीशिवाय हरभरा, मिरची, टोमॅटो इत्यादी अनेक पिकांवर उपजीविका करते. जास्त आर्द्रता व उष्ण तापमान या किडीसाठी पोषक असते.

भेंडी फळ पोखरणाऱ्या अळीची ओळख (Identification of okra fruit borer) :

  • अळी तपकिरी रंगाची असून, शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात.
  • सुरवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याना पोखरून आत भुयार तयार करते.

भेंडी फळ पोखरणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms of okra fruit borer) :

  • प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल होऊन खालच्या दिशेने लोंबतो व नंतर वाळतो.
  • अळीने पोखरलेल्या कळ्या व फुले वाळून खाली पडतात.
  • फळांवर अळीने केलेल्या छिद्रात तिची विष्ठा दिसते.
  • प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात.
  • फळांची वाढ होत नाही.
  • अशी फळे विक्री योग्य राहत नाही.

आर्थिक नुकसान पातळी :

एक अळीचा पतंग प्रति मीटर रांगेत किंवा 2 टक्के नुकसान.

एकात्मिक नियंत्रण:

  • कीडग्रस्त फळे तोडून आतील अळीसह नष्ट करावीत.
  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.
  • शेतात एकरी 10 पक्षी थांबे लावावेत.
  • सुरवातीच्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा. त्यामुळे ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण या मित्र कीटकांचे संरक्षण होऊन हानिकारक किडीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होईल.
  • 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (300 पीपीएम) १ लिटर प्रति २०० ली  पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, एचएएनपीव्ही (250 एलई) या विषाणूजन्य कीटकनाशकाची १०० मिलि प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.
  • रासायनिक कीटकनाशकाची फवारणी फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर पावसाची उघडीप असताना करावी.

फळे पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा) :

  • कीड बहुभक्षी असून, भेंडीशिवाय कापूस, तूर, टोमॅटो इ. अनेक पिकावर उपजीविका करते.
  • प्रौढ मादी पतंग झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फळावर 300 ते 500 अंडी देते.
  • 5 ते 7 दिवसात या अंड्यातून बाहेर पडणारी अळी फळे पोखरून अनियमित आकाराची छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे शरीर आत ठेऊन आतील भाग खाते.
  • अळीची पूर्ण वाढ होण्यास 14 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो.
  • अळीचा रंग हिरवट असतो.
  • पिकानुसार अळीच्या विविध रंगछटा दिसून येतात. तिच्या शरीरावर तुरळक केस व तुटक अशा गर्द करड्या रेषा असतात.
  • अळी जमिनीत झाडाच्या वेष्टणात कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवड्यापासून महिनाभर असू शकते.

रासायनिक नियंत्रण (Okra fruit borer chemical control) :

  • थियामेथोक्साम 12.6% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 9.5% ZC (देहात - एन्टोकिल) - 80 मिली किंवा
  • बीटा-साइफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (बायर सोलोमन) - 100 मिली किंवा
  • प्रोफेनोफोस 40% + साइपरमेथ्रिन 4% ईसी (देहात - कटरकिल ) - 400  मिली किंवा
  • एमेमेक्टिन बेंजोएट 5% एसजी (देहात - इल्लिगो ) - 100  ग्रॅम किंवा
  • बिफेंथ्रिन 10% ईसी (देहात हर्ल) - 300 मिली किंवा
  • डेल्टामेथ्रिन 100 ईसी (बायर डेसिस 100 ईसी) - 200 मिली किंवा
  • साइपरमेथ्रिन 3% + क्विनालफॉस 20% ईसी (यूपीएल विराट) - 200 मिली किंवा
  • फ्लुबेंडियामाइड 480 एससी (बायर फेम) - 60  मिली किंवा
  • स्पिनोसैड 45% एससी (डाऊ एग्रो सायन्स ट्रेसर) - 100 मिली किंवा
  • क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% एससी (देहात - अटैक) - 60 मिली किंवा
  • सायंट्रानिलिप्रोल 10.26% (एफएमसी बेनेविया) - 300 मिली
  • किडीच्या प्रादुर्भावानुसार वरील पैकी कोणतेही एक कीडनाशक प्रति 200 लिटर पाण्यात  मिसळून प्रति एकर  फवारणी करावी.

कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणीच्या वेळी लक्षात ठेवायच्या गोष्टी:

  • फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
  • फवारणीसाठी वापरण्यात येणारे पाणी हे 6.5 ते 7.5 पीएच चे असावे.
  • फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा आहे याची खात्री करून घ्यावी.
  • फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
  • फवारणी मिश्रणामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नयेत.
  • पीक वाढीच्या सुरुवातीच्या 60 दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.
  • एकाच वेळी एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारू नये.
  • त्वचेला हानी, इजा होऊ नये म्हणून कीटकनाशके उघड्या हाताने हाताळू नयेत. हात मोज्यांचा वापर करावा.
  • श्‍वासाद्वारे शरीरात जाऊन विषबाधा होऊ नये यासाठी फवारणी करताना नाक आणि तोंडाला मास्क लावावा.
  • फवारणीचे तुषार/शिंतोडे डोळ्यात गेल्यास गंभीर इजा होऊन दृष्टी जाऊ शकते. त्यामुळे डोळ्यांना गॉगल किंवा संरक्षक हूड लावावे.
  • विषबाधेची लक्षणे दिसताच त्वरित उपचार करून घ्यावेत.

तुमच्या पिकात फळ पोखरणाऱ्या अळीची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भेंडी पिकासाठी उपयुक्त हवामान कोणते?

भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे. समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान हे भेंडी पिकासाठी उपयुक्त असते.

2. भेंडी पिकामध्ये आढळणाऱ्या प्रमुख किडी व रोग कोणते?

भेंडी पिकामध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणारी अळी, भुरी आणि केवडा हे प्रमुख रोग व किडी आढळून येतात.

3. भेंडी पिकातील फळ पोखरणारी अळी कशी ओळखावी?

भेंडी फळ पोखरणारी अळी तपकिरी रंगाची असून, शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. सुरवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याना पोखरून आत भुयार तयार करते.

38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor