पांढरं सोनं शेतकऱ्यांसाठी यंदा ठरलं आतबट्ट्याचं; बाजारात कापसाला साधा हमीभावही मिळेना
कापसाला बाजारात सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. मध्यम धाग्याचा कापसाला हमीभाव ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला. पण बाजारात सरासरी बाजारभाव ६ हजार ७०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे उत्पादन कमी होऊनही शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. देशात यंदा कापसाची लागवड कमी झाली. त्यातच पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका उत्पादनाला बसला. त्यामुळे कापसाला चांगला भाव मिळले, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदा उत्पादन कमी राहूनही कापसाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. उत्पादनात घट झाल्याने उत्पादन खर्च वाढला. दुसरीकडे कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक तोटा वाढला आहे. बाजारात सध्या कापसाचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ५०० रुपयांपर्यत कमी आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor