तपशील
पांढऱ्या कांद्याला बाजारात मागणी
उरण तालुक्यात खरीप हंगामात भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाहीत; परंतु गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने उरण व अलिबाग तालुक्यात पांढऱ्या कांद्याची लागवड होऊ लागली आहे. औषधी समजल्या जाणाऱ्या चविष्ट पांढऱ्या कांद्याला उरणच्या बाजारात मोठी मागणी आहे. पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पेंटट विभागाने हे मानांकन बहाल केले आहे. त्यामुळे रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असलेल्या या कांद्याला मागणी वाढली असून दरही चांगला मिळत आहे. औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी उरणच्या बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor