ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलं, टोमॅटोची लाली कायम

कोल्हापूर आणि कर्नाटक सीमा भागात संततधार पाऊस होत असल्याने आठवडी बाजारासह घाऊक विक्रेत्यांमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मेथी, शेपू, कांदापात, पालकचे दर मागील काही दिवसांपूर्वी वीस ते तीस रुपये पेंडी असे होते. आता मात्र याच भाज्यांचे दर दहा रुपयाला तीन आणि दोन पेंड्या याप्रमाणे कमी झाले आहेत. दर कमी असूनही म्हणावा तसा मालाला उठाव नाही. त्यामुळे आजच्या आठवडा बाजारात अनेक भाजी व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या पालेभाज्या परत न नेता तेथेच टाकून जाणे पसंत केले. अनेकांनी तर खरेदीसाठी घातलेले पैसेही न निघाल्याची सल बोलून दाखविली.
38 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
