पावसाचा हाहाकार भाजीपाला कुजला; दरात वाढ, आवक थंडावली
पावसामुळे आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढली होती परंतु कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने पुन्हा भाजी पाल्याची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. बाजार समितीत कर्नाटक आवक ठप्प झाली असून, स्थानिक आवक थंडावली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव येत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर काही ठिकाणी शेतात पाणी राहिल्याने भाजीपाला कुजून जात असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावं लागत आहे. स्वीट कॉर्न मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला आहेत. टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. भाज्यांचे दर दुप्पटीने वाढले आहेत. हंगाम नसल्याने फुलांचा भाव गळून पडला आहे. गुलाबाचे दर टिकून आहेत. धान्य बाजारात डाळींचे दर काहीसे वाढले आहेत.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor