पेरणीनंतर 48 तासांमध्ये तणनाशक का फवारावे?
नमस्कार शेतकरी बंधुनो,
तण हे कृषि उत्पादन पद्धतीमधील प्रमुख अडथळा आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार एक तृतीयांशपेक्षा जास्त उत्पादनातील घट ही केवळ तणांमुळे येते. तसेच तणांचा अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. तणामुळे केवळ पीक उत्पादनच घटत नाही तर तणांच्या प्रादुर्भावामुळे कृषि उत्पादनाची गुणवत्ता, जैव विविधता, मनुष्याचे व प्राण्यांचे आरोग्य या गोष्टींवरही विपरीत परिणाम होतो. आजच्या या लेखात आपण पेरणीनंतर लगेच तणनाशकांचा वापर केला तर काय फायदे व तोटे होतात याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
तणांमुळे पीक उत्पादनात सरासरी 33 टक्के घट येते, या तुलनेत कीटकांमुळे 26 टक्के, रोगामुळे 20 टक्के व इतर घटकांमुळे 21 टक्के घट येते. याचा अर्थ इतर कोणत्याही घटकांमुळे येणा-या घटीपेक्षा पीक उत्पादनामध्ये तणांमुळे येणारी घट ही अधिक असते. या सर्व बाबींचा विचार करता प्रभावी तण व्यवस्थापन पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. रब्बी हंगाम अगदी उंबरठ्यावर असल्यामुळे आता रब्बी हंगामात कोणती तणनाशक वापरावी व ती कशी उपयोगी पडतात याविषयी जाणून घेऊया.
रब्बी पिकांमध्ये पेरणीनंतर लगेच वापरायची तणनाशके:
ज्वारी व मका
- एट्राजीन 50% डब्लूपीची (एट्राफोर्स- देहात ) 400 ते 800 ग्रॅम सर्व प्रकारच्या तणांवर व तणे उगवण्यापूर्वी एकरी 800 ते 1600 ली पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर 45 दिवसांनी एक खुरपणी करावी.
- किंवा एलाक्लोर 50% ईसीची (स्वाल-स्वच्छ) 1600-2000 मिली वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांसाठी एकरी 200- 300 ली पाण्यातून फवारणी करावी.
गहू
- पेंडीमेथालिन 30% ईसीची (यूपीएल - दोस्त) 700-1000 मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानांची तणे व तणे उगवण्यापूर्वी एकरी 300 ली पाण्यातून फवारणी करावी
- मेट्रिबुझीन 70% डब्लूपीची (टाटा रैलिस-टाटा मेट्री) 140 ग्रॅम जंगली ओत, केना गवत, रुंद पानांची तणे व तणे उगवण्यापूर्वी एकरी 200-300 ली पाण्यातून फवारणी करावी
- गव्हाच्या लवकरच्या पेरणीनंतर 35 ते 45 दिवसांनी व उशिरा पेरणीच्या 45 ते 50 दिवसांनी करावी.
हरभरा, मसूर व वाटाणा
- पेंडीमेथालिन 30% ईसीची (यूपीएल - दोस्त) 1400 ते 1600 मि.ली. रुंद पानांची व वार्षिक गवतवर्गीय तणे व तणे उगवण्यापूर्वी एकरी 200 ते 400 ली पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी एक खुरपणी करावी.
- ऑक्सिफ्लोरफेन 23.5 % ईसीची (युपीएल-अमिगो) 160 ते 200 मिली रुंद पानांची व वार्षिक गवतवर्गीय तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी एकरी २०० -३०० ली पाण्यातून फवारावे.
तणनाशकामुळे होणारे फायदे
- पीक उत्पादन वाढते.
- तणनाशके मॅन्युअल खुरपणी किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा अधिक किफायतशीर ठरतात, विशेषत: मोठ्या शेतात.
- हाताने तण काढणे किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींच्या तुलनेत तणनाशकांचा वापर केल्यास वेळ वाचतो.
- तणनाशके मशागतीची गरज कमी करतात, ज्यामुळे मातीची धूप रोखता येते आणि मातीचे आरोग्य सुधारते. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या यंत्रसामग्रीची गरज कमी करून ते हरितगृह वायूचे उत्सर्जनही करतात.
- तणनाशके शेतातील मजुरीचा खर्च कमी करू शकतात.
तणनाशकांमुळे होणारे तोटे
- काही तणनाशके नॉन-बायोडिग्रेडेबल असतात आणि दीर्घ काळासाठी हानिकारक असतात.
- तणनाशके किंचित विषारी आहेत. त्यामुळे ती विविध आजारांना कारणीभूत ठरू शकतात. काही डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्या आणि वापरकर्त्यांच्या श्वासोच्छवासावर देखील परिणाम करू शकतात आणि तण नाशकाच्या अयोग्य वापरामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
- वाहत्या पावसाच्या पाण्यासह तणनाशके प्रवाहात वाहून जाऊ शकतात किंवा भूगर्भातील पाण्याच्या पुरवठ्यात मिसळून पाणी प्रदूषित करू शकतात.
- तृणभक्षी तणनाशकांनी उपचार केलेल्या वनस्पती खाऊ शकतात ज्यामुळे वाढणाऱ्या अन्न साखळीत विषारी घटक जातील.
तुम्ही पेरणीनंतर तणनाशकांचा वापर करता का? तुम्हाला काय फायदे व तोटे होतात? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor