फळपिक क्लस्टरमधून होणार प्रक्रिया उद्योगांची उभारणी

प्रक्रियेअभावी राज्यात फळपिकांच्या दरात होणारी पडझड लक्षात घेता फळपिक क्लस्टर योजनेच्या माध्यमातून त्या- त्या पिकांवरील प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव मांडला जाणार असून विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्यावरील प्रक्रिया उद्योगाचा मार्गही याव्दारे मोकळा होणार आहे. याबाबतची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली. नागपुरी संत्र्याखालील सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. मात्र या भागात त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाची वाणवा असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच बांग्लादेशकडून सातत्याने आयात शुल्कात वाढ होत असल्याने निर्यातीवरही निर्बंध आले आहेत. परिणामी गेल्या काही वर्षांत संत्रा दर दबावात आल्याची स्थिती आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
