तपशील
ऐका
फणस
फळ
कृषी ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
5 Feb
Follow

फणसातील फळ व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

फणस हे नगदी पीक म्हणून फायदेशीर ठरू शकते. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये या फळाला फार वरचे स्थान आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत फणसाचे विविध पदार्थ विकून आणि निर्यात करून चांगली कमाई केली जाते. फणस मिश्र फळबाग लागवडीतील महत्वाचे असे फळ पिक आहे. फणस हे महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोकण तसेच भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशात येणारे एक प्रकारचे फळ आहे. फणसात गोड,पिवळसर/केसरी रंगाचे गरे असतात. आज आपण याच अत्यंत महत्वाच्या अशा हंगामी फळाविषयी जाणून घेणार आहोत.

फणसाच्या स्थानिक प्रजाती:

1)बरका 2)कापा 3)विलायती 4)नीर 5)सकल्या 6)डगुळ

फणस फळाविषयी:

  • इतर फळांच्या तुलनेत फणस आकाराने खुप मोठा असते.
  • काही फणस तर लांबीला 3 फुट व रुंदीला 1 फुट एवढेही आढळतात.
  • शेतकऱ्यांच्या दृष्टीने कापा आणि बरका ही दोन्ही प्रकारची झाडे महत्त्वाची आहेत.
  • फणसाच्या फांद्या जाड करण्यासाठी संतुलित अन्नपुरवठा हा सगळ्यात चांगला उपाय आहे.

फणसातील फुलांविषयी:

  • साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत फणसाच्या झाडाला फुले लागतात.
  • फणसामध्ये नर व संयुक्त (मादी फुले) अशी दोन प्रकारची फुले आढळतात; पण ती एकाच झाडावर असतात.
  • या फुलांमधला फरक बऱ्याचदा लक्षात येत नाही. झाडाच्या अगदी जवळ जाऊन निरीक्षण केल्यावरच हा फरक कळतो.
  • नर फुले ही गोलसर असतात आणि हाताने स्पर्श केल्यानंतर गुळगुळीतपणा जाणवतो, तर मादी फुले लांबट असून, काटेरी दिसतात.
  • ही फुले फणसाच्या फांद्यांवर लागतात; पण बहुतेक वेळा मुख्य खोडावर म्हणजेच मधल्या जाड्या खोडावर किंवा मुख्य खोडालगतच्या आलेल्या मोठ्या फांद्यांवर जी मादी फुले असतात, त्यांचेच रूपांतर फळांमध्ये होते.
  • उत्पादनाच्या दृष्टीने या दोन ठिकाणी आलेल्या फुलांवर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक ठरते.
  • फांद्या जेवढ्या जाड असतील, तेवढी सशक्त आणि जोमदार फुले लागतात, त्यामुळे उत्पादनातदेखील वाढ होते.

फुलगळ विषयी:

  • फणसाच्या झाडाला खोडावर फुले व फळे लागतात, म्हणजेच झाडाच्या स्वतःच्या सावलीत लागतात. बऱ्याचदा असे आढळून येते की, फुले आल्यानंतर नर फुले काळी पडून गळून पडतात. नर फुलांच्या लगत असलेली किंवा नर फुलाला चिकटून असलेली मादी फुलेदेखील पडतात.
  • जर फणसाच्या खोडावर सावलीचे प्रमाण जास्त असेल, तर अशा ठिकाणी फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच फणसाच्या मधल्या खोडावर पडणाऱ्या सावलीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

फुलगळ कशी नियंत्रित करावी?

  • झाडाची सरसकट छाटणी न करता तुरळक प्रमाणात फांद्यांची विरळणी केली, तर झाडाच्या आत पडणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण वाढेल.
  • ही विरळणी करताना कमकुवत फांद्यांची करावी.
  • फुलगळ योग्य वेळी नियंत्रित केल्यास फणस पिकातून भरघोस उत्पादन मिळविता येऊ शकते.

फळधारणा:

  • फळधारणेनंतर फळ तयार होण्यासाठी सुमारे 130 ते 140 दिवसांचा कालावधी लागतो.

खत व्यवस्थापन:

  • एका पूर्ण वाढलेल्या फणसाच्या झाडाला सुमारे 20 ते 30 किलो शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे.
  • पाचव्या वर्षापासून प्रत्येक झाडास एक किलो युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
  • पहिली पाच वर्षे वयानुसार वरील खतांची मात्रा द्यावी.
  • माती परीक्षणाच्या अहवालानुसार खते द्यावीत.
  • रोपे सात-आठ वर्षांनी धरू लागतात, तर कलमांचा बहार तिसऱ्या वर्षापासून सुरू होतो.
  • जेव्हा फळे सफरचंदाच्या आकारा एवढी असतात तेव्हा 0.52.34 - 5 ग्रॅम + चेलेट कॅल्शियम + बोरॉन - 1 ग्रॅमची प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

कसे करावे फळांचे संरक्षण:

  • झाडांमध्ये हवेचा संचार चांगला असावा.
  • झाडांना चांगला सूर्यप्रकाश मिळायला हवा.
  • फळांवर जखमा होऊ देऊ नका.
  • संक्रमित फळे झाडापासून तोडून नष्ट करा.
  • 10 अंश सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमानात फळे साठवा.
  • फळ कुज रोगावर नियंत्रणासाठी - कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी (टाटा-ब्लिटॉक्स) 2 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी (देहात-साबू) 2 ग्रॅमची प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

तुम्ही तुमच्या फणसातील फळाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


32 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor