पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार? केंद्रीय अर्थसंकल्पात मिळणार का गिफ्ट
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना मालाला किमान हमीभाव, कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार फुल नाही पण फुलाची पाकळी तरी देईल, अशी बळीराजाचा अपेक्षा आहे. 2024 या नवीन वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसानचा हप्ता वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच केंद्र सरकार चार हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor