ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Nov
Follow
पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडता
खानदेशात रब्बीतही पीककर्ज वितरण गतीने सुरू नाही. अद्याप पीक कर्ज वितरण १० टक्केही झालेले नाही. सुमारे एक हजार कोटी रुपये पीक कर्ज रब्बीत खानदेशात वितरित होईल, त्यासंबंधी राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांनी गतीने कार्यवाही करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. चार हजार कोटी रुपये पीककर्ज खरिपात वितरित करायचे होते. परंतु वितरण वेळेत झाले नाही. सुमारे ९० टक्के पीककर्ज वितरण खरिपात झाले आहे. पण यात राष्ट्रीयीकृत बँकांनी मनमानी केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
51 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor