पोकरा योजना, महाराष्ट्र (Pocra yojana - Maharashtra)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारत आपले सहर्ष स्वागत आहे!
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत पोकरा ही योजना येते. पोकरा ही योजना शेतकऱ्यांसाठी बनवली आहे. पोकरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय यशस्वी आणि उत्तम योजना आहे. ही योजना गरजू शेतकऱ्यांसाठी व या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणारी योजना आहे. चला तर मग जाणून घेऊया पोकरा योजनेविषयीची अधिक माहिती.
पोकरा योजनेअंतर्गत पुढील 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांना या योजनेचा लाभ घेता येईल:
- जळगाव
- बुलढाणा
- अकोला
- वाशिम
- यवतमाळ
- हिंगोली
- नांदेड
- वर्धा
- परभणी
- बीड
- लातूर
- उस्मानाबाद
- जालना
- अमरावती
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सर्वसाधारणपणे 155 तालुक्यांचा समावेश आहे आणि 3755 ग्रामपंचायती या योजनेमध्ये येतात आणि या योजनेचा लाभ साधारणपणे सतरा लाख शेतकऱ्यांना होतो.
पोकरा योजनेचे उद्देश:
- पोकरा योजनेचे मुख्य उद्दिष्ट बदलत्या हवामानामुळे शेतीला भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्याबरोबरच जागतिक बँकेच्या मदतीने या प्रकल्पात कृषी उत्पादनाची यंत्रणा सातत्याने विकसित करणे हे आहे.
- त्यामुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पादन देखील वाढेल.
- या योजनेद्वारे अल्पभूधारक आणि छोट्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यातील कृषी क्षेत्राच्या मुख्य साखळीत जोडले जाईल.
पोकरा योजनेसाठी अर्ज करायला पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
- आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचा सातबारा आठ 'अ' चा उतारा असले आवश्यक आहे
- अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास त्याचा पुरावा असावा
- अर्जदार अपंग असल्यास त्याचा पुरावा असावा
- बँक पासबुक
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प/पोकरा योजनेमध्ये पुढील घटक येतात:
- बियाणे उत्पादन युनिट
- कृषी यांत्रिकीकरण यामध्ये काही भागांमध्ये 60 टक्के तर काय भागांमध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते
- गोड्या पाण्यातील मत्स्य पालन यासाठी काही भागांमध्ये 75 टक्के अनुदान दिले जाते
- गोडाऊनसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते
- ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान दिले जाते
- कुक्कुटपालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते
- बंदिस्त शेळीपालन
- पाणी पंप
- मधुमक्षिका पालन
- रेशीम उद्योग
- विहीर आणि विहीर पुनर्भरण
- शेडनेट हाऊस
- वैयक्तिक शेततळे
- गांडूळ खत
- फळबाग लागवड / वृक्ष लागवड
- PVC पाईप
- आणि इतर तेल गिरणी, निंबोळी अर्क युनिट, मुरघास युनिट, शेळी पैदास केंद्र, मधमाशी पालन युनिट
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी:
- पोखरा पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- मेन्यूमधील शेतकरी पर्यावर क्लिक करा आणि नवीन नोंदणीवर क्लिक करावे.
- आता आपल्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये आपली नोंदणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेली दिसते.
- दोन्ही तपशील
- मूलभूत माहिती
- जमिनीची माहिती
- घोषणापत्र
- सर्वप्रथम आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मोबाईल नंबर टाकायचा आणि त्यानंतर गेट ओटीपी या बटणावर क्लिक करायचं
- आपल्या मोबाईल वरती जो ओटीपी येईल तो व्हेरिफाय करून घ्यायचा
- आधार व्हेरीफिकेशन करायचे
- नाव नोंदणी करताना मूलभूत माहिती आपल्याला भरायची आहे
- मूलभूत माहितीमध्ये आपल्याला पूर्ण पत्ता, जिल्हा, तालुका, गाव ही माहिती भरायची आहे
- मोबाईल नंबर, श्रेणी, जन्मतारीख इत्यादीची नोंद करायची आहे
- आपल्याला शेतकरी नोंदणी, जमिनीची माहिती भरायची आहे
- जमीन शेती कुठे आहे? जिल्हा, तालुका, गाव
- 8-A खाते क्रमांक
- क्षेत्रफळ
- जमिनीविषयी माहिती भरल्यानंतर आपल्याला घोषणापत्र भरायचे आहे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प/पोकरा संपर्क:
Phone: 022-22163351
Email: pmu@mahapocra.gov.in
तुम्ही पोकरा महाराष्ट्र योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. पोकरा योजनेअंतर्गत किती जिल्ह्यांचा समावेश आहे?
पोकरा योजनेंतर्गत 15 जिल्ह्यांचा समावेश आहे.
2. पोकरा योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे?
पोकरा योजनेअंतर्गत जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, वर्धा, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना व अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.
3. पोकरा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय?
पोकरा योजनेचे मुख्य उद्दिष्ट बदलत्या हवामानामुळे शेतीला भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्याबरोबरच जागतिक बँकेच्या मदतीने या प्रकल्पात कृषी उत्पादनाची यंत्रणा सातत्याने विकसित करणे हे आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor