बटाटा पिकामधील खत व्यवस्थापन (Potato crop : Fertilizer Management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
बटाटा हे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक असून, या पिकाची लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाटा हे कंद वर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाटा हे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून आधुनिक लागवड पद्धती, बियाणे निवड प्रक्रिया, योग्य खत व्यवस्थापन या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यास पिकापासून मिळणाऱ्या नफ्यात वाढ होऊ शकते. म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण बटाटा पिकामधील खत व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
बटाटा बीज प्रक्रिया:
- बियाणे उत्तम दर्जाचे असावे. एकरी 6 ते 8 क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते.
- बटाट्यावर येणाऱ्या रोगांचा विचार केला तर प्रामुख्याने उशिरा व लवकर येणारा अशा दोन प्रकारच्या करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- हा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर बेणे लागवडीच्या अगोदर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण घेऊन त्यामध्ये किमान 5 मिनिटे बेणे बुडवावे.
- जर तुमचे वीस क्विंटल बेणे असेल तर त्याकरिता शंभर लिटरचे द्रावण पुरेसे ठरते.
- तसेच बेण्याची वाढ चांगली व्हावी याकरिता (IFC) NPK जिवाणू किंवा देहात न्यूट्री NPK 500 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी अशाप्रकारे तयार द्रावणामध्ये बटाटे कमीत कमी अर्धा तास पर्यंत बुडवून ठेवावेत.
बटाटा पिकासाठी पूर्वमशागत:
- जमीनीची 20 ते 25 सें.मी. नांगरट करावी.
- 1 महिनाभार जमिनीस ऊन द्यावे.
- पुन्हा एक आडवी नांगरट करावी.
- ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
- जमिनीत एकरी 2 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे.
बेणे व लागवड पद्धत:
- बटाट्याची लागवड गादी वाफ्यावर करा.
- 2 ओळींमधील अंतर 2 फूट तर झाडांमधील अंतर 30 सें.मी किंवा 45 सें.मी ठेवा.
- ज्या बटाटा बेण्यावर डोळ्यांची संख्या असेल त्या बटाटा बेण्याची निवड करा.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management in Potato):
बेसल डोस:
यूरिया @ 35 किलो, डीएपी @ 80 किलो, म्यूरेट ऑफ पोटाश @ 55 किलो + देहात स्टार्टर 8 किलो, सल्फर 4 किलो पेरणीनंतर 25 दिवसांनी यूरिया 40 किलो + 25 किलो एमओपी प्रति एकरी द्यावा.
वापराची वेळ आणि खते:
पहिल्या 30 दिवसांत 19:19:19 (देहात न्यूट्री - एनपीके) @ 600 ग्रॅमची 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी आणि (देहात न्यूट्री - बूस्ट मास्टर) 200 ते 300 मिलीची 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी.
30 ते 45 दिवसां मध्ये म्हणजेच फुलोरा अवस्थेत अमिनो अॅसिड (देहात - फिक्सा) 400 मिली + बोरॉन 20% @ 200 ग्रॅमची 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी.
55 ते 60 दिवसां मध्ये 0:52:34 (देहात न्यूट्री - एमकेपी) @ 200 ग्रॅम व मिक्स मायक्रो न्यूट्रीएंट 200 ग्रॅमची 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी
70 ते 80 दिवसानंतर 0:0:50 (देहात न्यूट्री - एसओपी) @ 1000 ग्रॅम आणि बोरॉन 20% @ 200 ग्रॅमची 200 लीटर पाण्यातून फवारणी करावी
पाणी व्यवस्थापन (Water Management in Potato):
- बटाट्याची मुळे जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पाळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे.
- लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे.
- जमिनीलगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्या वेळेस 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात.
आंतरमशागत:
- बटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे व खुरपणी या बरोबर भर देणे देखील महत्त्वाचे आहे.
- तीन चार वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी.
- खतांचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीची भर द्यावी.
काढणी आणि उत्पादन (Harvesting and Production of Potato) :
सर्व सुधारीत तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पीक घेतल्यास लवकर तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन एकरी 80 क्विंटल तर उशिरा तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन एकरी 100 ते 120 क्विंटल पर्यंत येऊ शकते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार बटाटा लागवड केल्यास, योग्य खत व्यवस्थापन केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या बटाटा पिकात कशाप्रकारे खत व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. बटाटा पिकाची लागवड कधी करावी?
बटाटा पिकाची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करावी.
2. बटाट्याचे पीक किती दिवसात येते?
बटाट्याचे पीक 90 ते 100 दिवसांत कापणीसाठी तयार होते.
3. बटाटा पिकात आढळून येणारे मुख्य रोग कोणते?
करपा व खोक्या रोग हे बटाटा पिकात आढळून येणारे प्रमुख रोग आहेत.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor