प्रधानमंत्री पीक विम्याचा बोजवारा, कागलमध्ये अद्याप पंचनामे नाहीत
कागल तालुक्यातील दोन हजार १७० शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पीक विम्यासाठी पाच हजार ४५ अर्ज दाखल केले होते. यामध्ये एक हजार ३१५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. महापुराच्या पाण्यात पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष दहा ते पंधरा दिवसांपूर्वी शेतावर जाऊन नुकसानीची ऑनलाईन तक्रार दाखल केली; परंतु विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी फिरकलेच नसल्याचे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे कागल तालुक्यातील वेदगंगा व दूधगंगा नदीकाठावरील शेकडो एकरांवरील उसासह भात, सोयाबीन भुईमूग पिके कुजून गेली आहेत. यंदा तब्बल १८ दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली होती. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडून पंचनामे कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor