तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Oct
Follow

प्रलंबित विमा भरपाई ६ जिल्ह्यांसाठी मंजूर

राज्यातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप-२०२३ मधील पीक विम्याचे प्रलंबित १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत. यात नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. राज्यात पीकविमा योजनेसाठी 'बीड पॅटर्न' रबविण्यात येत आहे. बीड पॅटर्ननुसार विमा भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त आल्यास ११० टक्क्यांपर्यंत विमा भरपाई विमा कंपनी देते, तर त्यापुढची भरपाई राज्य शासन देते. ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई यंदा ११० टक्क्यांपेक्षा जास्त आली होती.


52 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor