तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Mar
Follow

पशुसंवर्धन-दुग्धविकास विभागाचे होणार एकत्रीकरण

राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यास बुधवारी (ता. 13) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानंतर हा विभाग पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग या नावाने ओळखला जाणार आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसाय हा कृषिपूरक व्यवसाय न राहता तो शेती एवढाच मुख्य व्यवसाय म्हणून विकसित करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यातून रोजगार निमिर्ती व उद्योजकता निर्माण करण्याबरोबरच पशुपालकांच्या आर्थिक स्थैर्यात वाढ होईल. पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्ध व्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर ‘आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय’ असे नाव होणार आहे.


64 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor