ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Jan
Follow
पुढील हंगामात ऊसपीक कर्जदरात होणार वाढ; हेक्टरी ८ हजार ५०० रूपयांची वाढ होणार

जुलैनंतर हंगाम २०२५/२६ मध्ये ऊस पीक कर्ज दरात वाढ होणार आहे. हेक्टरी ५ टक्के वाढीचा निर्णय जिल्हास्तरीय पीक कर्ज कमिटीने निश्चित केला असून याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यानुसार आडसाली ऊस पिकासाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, तर खोडवा उस पिकासाठी हेक्टरी ५ हजार ७५० रुपये पीक कर्जात वाढ करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांची कर्ज खाती जास्त होत असल्यामुळे सुरू व खोडवा पिकासाठी सरासरी सव्वा लाख रुपये पीक कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
41 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
