तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Dec
Follow

पुणे विभागात ७५ टक्क्यांवर पेरण्या

विधानसभेच्या निवडणुका व ऊस गळीत हंगाम वेळेत सुरू न झाल्यामुळे रब्बी पेरण्या धीम्या गतीने सुरू होत्या. त्यातच मागील पंधरवड्यात थंडी वाढल्यामुळे वेगात पेरण्या सुरू झाल्या आहेत. पुणे विभागात सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी सुमारे ८ लाख ६० हजार ६९६ हेक्टर म्हणजेच ७५ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु मागील पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उगवण झालेल्या पिकांवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor