राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीसाठीच्या तरतुदी! वाचा यादी!
शेतीसाठीच्या अर्थसंकल्पातील घोषणा: राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या नवीन योजनेअंतर्गत (Maharashtra Budget ) 8 लाख 50 हजार कृषी पंप बसवण्यात येणार आहे. 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - 2' अंतर्गत 7 हजार मेगाव्हॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याची सरकारची योजना असेल. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पीएम कुसूम योजनेअंतर्गत यावर्षी 1 लाख कृषी पंप स्थापनेचे उद्दीष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 78 हजार 757 पंप कार्यान्वित झाले असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी 'जनवन विकास योजने'अंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जा कुंपणासाठी अनुदान मिळणार आहे. राज्यातील 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येईल. राष्ट्रीय पशूधन अभियानाअंतर्गत शेळी, मेंढी, वराह, कुक्कुट आणि वैरण विषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. असेही अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत म्हटले आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor