रासायनिक खतांचा सरासरी वापर १ लाख टनांवर
जिल्ह्यात वर्ष २०१९ पर्यंतच्या रासायनिक खतांच्या सरासरी वापराच्या तुलनेत २७ हजार ७६९ टनांनी वाढ होऊन २०२० ते २०२२ या तीन वर्षांत सरासरी वापर १ लाख ९६९ टन झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोमवार (ता. २९) पर्यंत विविध ग्रेडची मिळून एकूण ९३ हजार १६७ टन रासायनिक खते विक्री झाली आहेत. ५५ हजारांवर टन खते शिल्लक होती. २०१७ ते २०१९ कालावधीतील परभणी जिल्ह्यातील रासायनिक खतांचा वापर सरासरी ७३ हजार २० टन होता. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी २०२२ मध्ये विविध मोहिमा आखण्यात आल्या. त्यात जमीन आरोग्य पत्रिका सुपीकता निर्देशांकावर आधारित खतांचा वापर, बियाण्यास जैविक खतांची प्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांचे बियाणे वितरित करणे, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उसाचे पाचट कुजविणे, कंपोस्ट, गांडूळ खते तयार करून वापर करणे यांचा समावेश होता.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor