राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) महाराष्ट्र (Rashtriya Krishi Vikas Yojana)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले स्वागत आहे!
राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) ही 2007 मध्ये केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक सरकारी योजना आहे जी राज्यांना त्यांच्या स्वत:च्या कृषी विकास योजना तयार करू देते. ही योजना पीक उत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, कृषी संशोधन आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात मदत पुरवते. कृषी क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयीची सविस्तर माहिती.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे उद्दिष्ट (Purpose):
- कृषी आणि कृषीशी संबंधित क्षेत्राचा विकास करणे.
- कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे.
- कृषी व्यवसायाला चालना देणे.
- सर्व राज्यांना त्यांच्या स्थानिक गरजांनुसार नियोजन करताना केंद्र सरकारद्वारे लवचिकता पुरविणे.
- देशातील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार राज्य व जिल्हा स्तरावर योजना तयार करून शेतकऱ्यांना मदत करणे.
- शेती संबंधित व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
- शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
- कौशल्य विकास नवकल्पना व शेती व्यवसाय करण्यासाठी तरुणांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील महत्त्वाच्या पिकांमधील उत्पादन वाढवणे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेची वैशिष्ट्ये (Features):
- राष्ट्रीय कृषी विकास योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे.
- मागील 3 वर्षाच्या सरासरी खर्चाच्या आधारे पायाभूत खर्चाची गणना करण्यात येते.
- या योजनेच्या माध्यमातून संबंधित क्षेत्राला संयुक्तपणे एकत्र करण्याचे काम केले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक वाटप करण्यात येते जेणेकरून शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत होते.
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे जिल्हा आणि राज्यस्तरावर कृषी आराखडे तयार करणे अनिवार्य आहे.
- या योजना निश्चित ठरवलेल्या कालावधी प्रकल्पांना मान्यता देणे.
- केंद्र सरकारची ही योजना राज्य सरकारकडून राज्यभरात राबवली जाते.
- राष्ट्रीय कृषी विकास योजना निश्चित कालावधी असलेल्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे काम करते.
- राज्य सरकारने RKVY-RAFTAAR योजनेच्या निकषाचे पालन करून शेतीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे त्यांनी RKVY या योजनेतून बाहेर पडले तरीही अंमलबजावणी सुरूच ठेवली पाहिजे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेले घटक:
- फलोत्पादन
- दुग्ध व्यवसाय
- मत्स्य व्यवसाय
- पीक संवर्धन
- कृषी संशोधन आणि शिक्षण
- कृषी वित्तीय संस्था
- मृद आणि जलसंधारण
- अन्न साठवणूक आणि गोदाम
- वृक्षरोपण आणि कृषी विपणन
- वनीकरण आणि वन्यजीव
- इतर कृषी कार्यक्रम आणि सहकार्य
राष्ट्रीय कृषी विकास योजनेची पात्रता (Eligibility):
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी तुमची शेती असणे आवश्यक आहे.
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पात्र आहेत.
- राज्य कृषी आराखडे (SAP) आणि जिल्हा कृषी आराखडे (DAP) तयार करणे.
- केंद्र सरकारने निधी वाटप केल्यानंतर राज्य सरकारची रक्कम थेट शेतकरी किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित समूहाला दिली जाईल.
- अर्जदार शेतकरी कृषी किंवा कृषी संबंधित क्षेत्रात काम करणारा असावा.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीची कागदपत्रे (Documents):
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
RKVY प्रकल्पांतर्गत निधी प्राप्तीसाठी राज्यांनी सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी :
- प्रेमासिक आधारावर कार्य प्रदर्शन अहवाल (भौतिक आणि आर्थिक उपलब्धता) आणि दिलेल्या कालावधीत परिणाम निर्देशित स्वरूपात देणे आवश्यक आहे
- मागील आर्थिक वर्षापर्यंत वाटप केल्या निधीसाठी 100% उपयोगिता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी अर्ज प्रक्रिया (Online Application):
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला rkvy.nic.in भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचे होम पेज उघडेल.
- त्यानंतर तुम्हाला होम पेजवर Apply Now हा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर स्क्रीनवर एक अर्ज उघडेल.
- या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
- त्यानंतर तिथे विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून घ्या.
- अर्ज तपासून झाल्यानंतर तुमच्या समोर सबमिट बटन असा ऑप्शन असेल.
- त्यावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
- अशा सोप्या पद्धतीने तुम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
तुम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) महाराष्ट्रचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती?
rkvy.nic.in ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.
2. राष्ट्रीय कृषी विकास योजना कधी व कोणाद्वारे सुरु करण्यात आली?
राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) ही 2007 मध्ये केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली.
3. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय?
कृषी आणि कृषीशी संबंधित क्षेत्राचा विकास करणे, कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि कृषी व्यवसायाला चालना देणे हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor