तपशील
ऐका
रोग
कृषी ज्ञान
गुलाब
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
7 Aug
Follow

गुलाबातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Rose: Major Disease and management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

गुलाबाच्या फुलांची शेती हा अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात किफायतशीर शेती व्यवसायांपैकी एक आहे. या फुलांचा मोठ्या प्रमाणावर सजावटीच्या उद्देशाने वापर केला जातो आणि गुलाब हे सुंदर रंग, सुगंध आणि आकार यासाठी लोकप्रिय आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुलाबाच्या वाढत्या मागणीमुळे, भारतातील अनेक शेतकऱ्यांसाठी गुलाबाची लागवड हा एक फायदेशीर व्यवसाय बनला आहे. महाराष्ट्रात फुलशेतीचा प्रसार झपाट्याने होत आहे. महाराष्ट्रातील हवामानात गुलाब वर्षभर फुलते. तथापि, गुलाब शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी, एखाद्याला योग्य ज्ञान आणि कौशल्ये असणे आवश्यक आहे. तसेच गुलाब पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण गुलाब पिकातील प्रमुख रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

गुलाब पिकात प्रामुख्याने पुढील रोग आढळून येतात:

करपा

भुरी

केवडा

शेंडेमर

काळे ठिपके

करपा (Rose Blight):

  • करपा हा सुध्दा गुलाब पिकावर आढळणाऱ्या प्रमुख रोगांपैकी एक आहे.
  • करपा हा रोग बुरशी पासून होतो.
  • करपा रोगाचे लक्षण गुलाब पिकाच्या खालच्या पानावर दिसून येते त्यानंतर करपा वरच्या दिशेने वाढत जातो. यामुळे पानावर काळे ठिपके दिसतात, पाने गळतात व परिणामी गुलाबाचे पीक करपून मरते म्हणूनच या रोगाला करपा रोग म्हणतात.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • उपाययोजना म्हणून करपलेली पाने जाळावी.
  • पिकाची फेरपालट करावी.
  • रोगविरहित फळांचे बी वापरावे.
  • जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने, फुले काढून नष्ट करावी.
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने बियाण्याची प्रक्रिया करावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच किंवा लागवडीनंतर 45 दिवसांनी,
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) ४00 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • करपा रोग नियंत्रणासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 300 मिलीची 200 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास गुलाब पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.

भुरी रोग (Rose Powdery Mildew):

  • पावडरी बुरशी हा एक बुरशीजन्य रोग आहे जो रोपाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या पावडरीच्या वाढीमुळे होतो, ज्यामुळे पाने विकृत होतात आणि प्रकाश संश्लेषण कमी होते.
  • पानांच्या वरील बाजूस पांढऱ्या रंगाचे डाग दिसून येतात.
  • वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
  • गुलाबावर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते.
  • कालांतराने हे डाग काळसर होतात आणि गुलाबाचा दर्जा पूर्णपणे ढासळतो
  • हा रोग देठ, खोड आणि फुलांवरही पसरतो. यामुळे रोपांची वाढ खुंटते.
  • दमट हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
  • भुरी रोग झाल्यास पाने मोठ्या संख्येने गळण्यास सुरुवात होते.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • हेक्साकोनाजोल 5% ईसी (टाटा - कॉन्टाफ) 200 मिली/200 लीटर किंवा
  • मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (Dow - systhane) 80 ग्रॅम/200 लीटर किंवा
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% डबल्यु/डबल्यु (देहात - ॲझिटॉप) 200 मिली/200 लीटर  किंवा
  • डायफेनोकोनाझोल 25% ईसी (सिजेंटा - स्कोर) 100 मिली/200 लीटर किंवा
  • टेट्राकोनाझोल 3.8% ईडबल्यु (पेप्टेक बायोसाइंसेज - PBL) 150 मिली/ 200 लीटर पाण्यातून एकरी फवारणी करावी.

केवडा किंवा डाऊनी मिल्ड्यू (Rose Downy Mildew):

  • गुलाब पिकातील प्लझमोपॅरा व्हीटीकोला (Plasmopara Viticola) या बुरशीचे धागे एक पेशीय नळीच्या आकाराचे असतात.
  • या बुरशीचे चर बीजूक रोपाच्या भागावर वाढत असतांना आपली मुळे (हॉसस्टोरिया) वेलीच्या पेशीत प्रवेश करतात.
  • यांचा शिरकाव हिरव्या भागावरील त्वचारंध्रा किंवा जखमेतून होत असतो. .
  • या रोगामुळे गुलाब पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते.
  • या रोगाला दमट वातावरण अनकूल असते.
  • या रोगाची लागण गुलाब पिकात पाने, फुले यांवर होत असते. त्यामुळे रोगग्रस्त भागावरील विषाणू मृत होतात, रोगग्रस्त भाग निकामी होतो या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते.
  • या रोगाची लक्षणे पिकाच्या सर्व हिरव्या भागांवर आढळतात.
  • हिरव्या पानावर सुरवातीस लहान तेलकट डाग पडतात.
  • पानाच्या खालील भागावर ठिपका असलेल्या ठिकाणी बुरशीची वाढ दिसते.
  • दमट हवामानात तो भाग रोगग्रस्त होऊन वेलीवरून गळतो.
  • हा रोग दमट वातावरणात बुरशीला दीर्घकाळ पोषक असल्यास संपूर्ण कोवळी पाने, फुले यावर आक्रमक होतो.
  • या रोगामुळे गुलाबाचे पीक जळून मरते. गुलाब अर्धवट वाढते व देठावर बुरशी वाढते.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम/ 200 लीटर किंवा
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्सिल एम 4.0 % + मॅन्कोझेब 64 % डब्ल्यू/डब्ल्यू (सिजेंटा-रिडोमिल गोल्ड) 600 ग्रॅम/ 300 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • कॅप्टन 50% डबल्युपी (पेप्टेक बायोसाइंसेज-PBL) 1000 ग्रॅम एकर किंवा
  • सायझोफॅमिड 34.5% एससी (यूपीएल-रॅनमॅन) 160 मिली/ 200 लीटर एकर किंवा
  • मेटीराम 70% डबल्यु जी (बीएएसएफ-पॉलीराम) 160 ग्रॅम/ 200 लीटर एकर फवारणी करावी.

शेंडेमर रोग (Rose Shendemar) :

  • कोवळ्या पानांवर थोडे पिवळे ठिपके दिसतात जे नंतर वाढुन पिवळ्या आणि तपकिरी सुकलेल्या गोल कडांच्या डागात आणि पट्ट्यात बदलतात.
  • नंतर शेंडेमर हा रोग देठ, फांद्या आणि कळ्यांपर्यंत पसरतो.
  • बाधीत रोपांची वाढ खुंटते, विकृत पाने आणि सामान्य पिवळेपणा दिसतो.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% डबल्यु/डबल्यु (देहात - ॲझिटॉप) 200 मिली/200 लीटर  किंवा
  • अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) 200 मिली प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • सायमोक्सॅनिल 8% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी (ड्युपॉन्ट-कर्झेट) 600 ग्रॅम 200 लिटर पाणी प्रति एकर फवारणी करावी.

काळे ठिपके (Rose Black spots):

  • पानांच्या खालच्या बाजूला काळे ठिपके दिसतात.
  • हे जांभळट किंवा काळे धब्बे झपाट्याने वाढुन 2 ते 12 मि.मी. होतात आणि कडा पसरलेल्या असतात.
  • पानांचा सभोवतालचा भाग पिवळा पडुन पाने अकाली गळतात.
  • काहीवेळा छोटे, काळे, खवल्यांसारखे धब्बे कोवळ्या फांद्यांवर उमटतात.
  • गंभीर संक्रमण झाल्यास गुलाबाची बहुतेक सर्व पाने गळतात आणि फुलेही कमी लागतात.

नियंत्रणाचे उपाय (Remedy):

  • रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% डबल्यु/डबल्यु (देहात - ॲझिटॉप) 200 मिली/200 लीटर  किंवा
  • अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या गुलाब पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. गुलाब पिकाला लागणारे प्रमुख रोग कोणते?

भुरी, काळे ठिपके, करपा हे गुलाब पिकाला लागणारे प्रमुख रोग आहेत.

2. महाराष्ट्रात गुलाबासाठी योग्य हवामान कोणते?

महाराष्ट्रातील हवामानात गुलाब वर्षभर फुलते.

3. गुलाबासाठी कोणती जमीन योग्य असते?

गुलाबाला हलकी ते मध्यम जमीन योग्य असते.

4. गुलाबाची अभिवृद्धी कशी करता येते?

गुलाबाची अभिवृद्धी बी, फाटे कलम, गुटी कलम आणि डोळा भरून करता येते.

45 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor