रत्नागिरीत फुलांची आवक घटली
मार्गशीर्ष महिन्यातील धार्मिक पूजा विधी, लग्न सोहळा अशा कार्यक्रमांमुळे विविध प्रकारच्या फुलांची विक्री वाढलेली आहे. मात्र गेल्या आठ दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडलेली असून फुलांची रत्नागिरी जिल्ह्यातील आवक घटलेली आहे. त्यामुळे फुलांचे दर वधारलेले आहेत. सध्या गुरूवारी व्रतवैकल्यासाठी सुमारे पाच टनांहून अधिक फुलांची विक्री होत असून त्यामधून सुमारे १० लाखांची उलाढाल होते. सध्या लगीन सराई सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात लग्न समारंभात इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडून सजावटीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यांच्याकडून फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. गतवर्षी विवाहाच्या तारखा व लग्न योग कमी होते. त्यामुळे प्रलंबित राहिलेले विवाह सोहळे यंदा आटपून घेण्यावर भर दिला जात आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor