तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 May
Follow

सांगलीच्या दुष्काळी भागात चारा प्रश्न गंभीर, चार महिन्यांत दूध उत्पादनात मोठी घट

सांगली जिल्ह्यात जसा उन्हाचा पारा वाढत चालला आहे तसा जनावरांच्या दुधात घट होत असल्याचे चित्र आहे. चारा टंचाईची समस्या वाढत चालल्याने चार महिन्यांत दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १८ लाख ६५ हजार ४९५ लिटर दूध संकलन होते. मे २०२४ मध्ये पहिल्या पंधरवड्यात सरासरी दूध संकलन १५ लाख २८ हजार लिटरपर्यंत घटले आहे. चार महिन्यांत तीन लाख ३७ हजार ३५० लिटरनी घट झाली. दिवसाला गाय दूध दोन लाख लिटर प्रतिलिटर दर २५ रुपये आणि म्हैस दूध दीड लाख लिटर दर ५० रुपये दर धरला तरी दिवसाला सुमारे १.२५ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.


12 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor