ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
साखर दरात वाढ होण्याची शक्यता, जुलै महिन्याचा कोटा केला कमी

केंद्र सरकारकडून जुलै महिन्यासाठी देशभरातील साखर कारखान्यांसाठी २४ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा विक्रीसाठी जाहीर केला. याबाबतची अधिकृत घोषणा काल (ता.२६) करण्यात आली. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात दीड लाख टनांनी कोटा कमी केल्याने साखरेच्या दरात प्रतिक्विंटल किमान १५ ते २० रुपये वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. मागच्या काही महिन्यात साखरेचे दर पडले होते. दरम्यान कोटा कमी केल्याने कारखानादांराना दरवाढीचा फायदा होण्याची शक्यता आहे.
41 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
