साखर कारखाने म्हणतात 100 रुपये द्यायला परवडत नाही, जिल्हाधिकारी भूमिका घेणार का?

कोल्हापूर: राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाच्या दरासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले. दरम्यान शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार उसाला 400 रुपये जादा दराची मागणी करण्यात आली होती. दरम्यान यावर जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करत यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा 100 अतिरिक्त तर मागील हंगामातील एफआरपीवर 100 रुपये जादा दर देण्याचे ठरले होते. परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपये दिला नसल्याचे चित्र आहे. मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला अतिरिक्त पैसे देण्याबाबत जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी असमर्थता दाखवली आहे. दरम्यान या साखर कारखान्यांनी पैसे कसे देता येत नाहीत याबाबत लेखी कळवले आहे. केवळ काही कारखान्यांनी पैसे देण्याची समर्थता दर्शवली आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
