साखर नियंत्रण कायद्यात तब्बल ५८ वर्षांनी होणार बदल, संभाव्य बदलांचा मसुदा प्रसिद्ध
साखरेच्या अनियंत्रीत दरामुळे साखर उद्योगाला मागच्या काही वर्षात अनिश्चितता आली होती. यावर केंद्र सरकारकडून दिलासा देण्यासाठी साखर नियंत्रण कायद्यात बदल करणार असून संभाव्य बदलांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावर साखर उद्योगांकडून २३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. यात साखरेचा दर ठरवणे, अन्य उपपदार्थांचा समावेश, खांडसरी उद्योगातील बदल, साखर पॅकिंग या संदर्भातील बदलांचा समावेश असणार आहे. साखर उत्पादनातील अलीकडील तांत्रिक प्रगतीचा विचार करून हे बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी या मसुद्याच्या आधारे साखर नियंत्रण कायदा १९६६ मध्ये काही बदल सुचवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने आजच या संदर्भातील अधिसूचना जारी केली. 'मसुदा साखर (नियंत्रण) आदेश २०२४' या नावाने हा मसुदा प्रसिद्ध केला आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor