तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Nov
Follow

सौर प्रकल्पांसाठी योग्यता प्रमाणपत्राची सक्ती हटवली

राज्यात सौर प्रकल्प उभारणीसाठी कोणत्याही सहकारी साखर कारखान्यांना योग्यता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करू नये, असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबत जारी केलेल्या परिपत्रकामुळे सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. 'कारखान्यांना सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आयुक्तालयाकडून योग्यता प्रमाणपत्र (हेल्थ सर्टिफिकेट) घेण्याची गरज नाही. मात्र, कारखान्यांना संबंधित यंत्रणांकडून प्रकल्प अहवाल, अर्थात डीपीआर' तयार करून घ्यावा लागेल. 'डीपीआर'ला मात्र आयुक्तालयाची आर्थिक व प्रशासकीय मंजुरी घेणे बंधनकारक असेल.

72 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor