तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 June
Follow

शासकीय केंद्रांमधून ज्वारी खरेदी रखडत

खानदेशात सुमारे ३० शासकीय ज्वारी खरेदी केंद्रे मंजूर झाली. परंतु यातील निम्मी खरेदी केंद्रे सुरू नाहीत. जेथे खरेदी सुरू आहे, तेथेही रोज एक ते दीड हजार क्विंटल ज्वारीचीच खरेदी केली जात आहे. खरेदी रखडत सुरू असून, गतीने ही कार्यवाही पार पाडावी, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ज्वारीचे दर यंदा बाजारात कमी आहेत. ज्वारीला हमीभाव ३१८० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. परंतु बाजारातील दर २००० रुपयांपर्यंत होते. ८० टक्के शेतकऱ्यांनी ज्वारीची बाजारात कमी दरात विक्री केली. परंतु अनेकांनी शासकीय खरेदी सुरू होईल, या अपेक्षेने ज्वारीचा साठा केला. यानंतर कमाल ज्वारीची बाजारात विक्री झाल्यानंतर शासकीय खरेदीसंबंधी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor