तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

शेतकऱ्यांच्या मालाचे बुकिंग आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन वेळापत्रकानुसार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन मध्यंतरीच्या काळात काही दिवस बंद होती. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट (संशोधन व विकास) या तत्त्वावर ही ट्रेन चालू केली आहे. शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन सुरू झाल्यामुळे नाशिकचे द्राक्ष, आंबे, डाळिंब, पालेभाज्या, फळभाज्या, तांदूळ, गहू, कांदा, वाइन, पेरू, कोबी, मिरच्या या परराज्यात जलद पोचणार आहेत. पर्यायाने शेतकऱ्यांच्या मालाला हायटेक भाव मिळेल. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी या ट्रेनची पार्सल बुकिंगसाठी रेल्वे स्थानक परिसरात गर्दी करीत आहेत.


45 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor