तपशील
ऐका
योजना
शेतकरी योजना
DeHaat Channel
1 year
Follow

शेतकऱ्यांच्या हिताची एक शेतकरी एक डीपी योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

वारंवार वीजपुरवठा खंडित होणं ही शेतकऱ्यांसाठीची मोठी समस्या आहे. आज आपण शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 14 एप्रिल 2014 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या एक शेतकरी एक डीपी योजनेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना शेतकऱ्यांसाठीची एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अखंडित उच्च दाब विद्युत प्रवाह उपलब्ध करून दिला जातो. 21 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने या योजनेबद्दल एक नवीन शासन निर्णय घेतला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा अनियमित वीज, लाईट जाणे, वीज कट, यामुळे जीव धोक्यात येऊ नये यासाठी एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा आतापर्यंत 90 हजार शेतकर्‍यांना लाभ झाला आहे.

शासन निर्णयान्वये 2023 करिता राज्यामध्ये ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. साधारणतः राज्यातील 45,437 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डीपी (Transformer) बसणार आहे. यासाठी शासनाकडून 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील शासन निर्णयाची PDF तुम्ही खालीलप्रमणे पाहू शकता.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202303211727180910.pdf

एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गतच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास ज्या शेतकऱ्यांची 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति एचपी 7000 रुपये द्यावे लागतील. तसेच अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व 5000 रुपये द्यावे लागतील.

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीमसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे –

  • आधार कार्ड

  • मोबाइल नंबर

  • शेताचे 7/12 प्रमाणपत्र

  • जातीचे प्रमाणपत्र

  • बँक खाते क्रमांक

एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ घेण्यासाठी Mahadiscom च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.

शेतकरी मित्रांनो जर तुमच्या मनात योजनेविषयी, अर्ज करण्याविषयी काही शंका असतील, तर खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करा.

राष्ट्रीय टोल-फ्री – 1912 / 19120

महावितरण टोल-फ्री – 1800-102-3435 / 1800-233-3435

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी https://dehaat-kisan.app.link/M3QtwoDCOzb हे वाचा.

  • एक शेतकरी एक डीपी योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा.

  • शेतीशी संबंधित महत्वपूर्ण माहितीसाठी अ‍ॅप्लिकेशनल भेट देत रहा तसेच इतर शेतकरी मित्रांसोबत माहिती शेयर करायला विसरू नका.



5 Likes
3 Comments
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor