तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Dec
Follow

शेतकऱ्यांच्या लसणाला चांगले दिवस, ग्राहकांची 'लसणाची फोडणी' मात्र महागली

राज्यात बहुतांशी भाजीपाल्यांच्या किमती वाढल्या असतानाच आता लसणाला प्रतिक्विंटल 15 हजार ते 27 हजारांपर्यंत दर मिळत आहे. लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलो 250 ते 300 रुपये द्यावे लागत असल्याने लसणाच्या फोडणीसाठी सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार असल्याचे चित्र आहे.

काल (दि. 7) पुणे बाजारपेठेत 458 क्विंटल एवढ्या सर्वाधिक लसणाची आवक झाली. प्रति क्विंटल कमीत कमी 15 हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला असून जास्तीत जास्त 27 हजार रुपये भाव मिळाला आहे.


49 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor