तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

शेतकऱ्यांना द्यावा लागेल आयकर? सरकार करू शकते विचार

नवी दिल्ली : श्रीमंत शेतकऱ्यांना आयकर लावण्याचा विचार भारत सरकार करू शकते, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्य आशिमा गोयल यांनी केले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत गोयल यांनी ही माहिती दिली. गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार पैसे हस्तांतरित करते. हा नकारात्मक आयकरच आहे. आता श्रीमंत शेतकऱ्यांना सकारात्मक आयकर लावला जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.


34 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor