शेतकऱ्यांसाठी न्यूट्रीवन बूस्ट मास्टर वरदान! - श्री. आदित्य सुधाकर जायले
देहात चे न्यूट्रीवन बूस्ट मास्टर हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन अकोली ता. अकोट, जि. अकोला येथील मोहन अॅग्रो एजन्सी येथे आयोजित फिल्ड डे कार्यक्रमात देहातचे अकोला जिल्हा विक्री अधिकारी श्री. आदित्य सुधाकर जायले यांनी केले.
अकोला तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी हा फिल्ड डे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील विविध ठिकाणाहून शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. या कार्यक्रमात शेतात बूस्ट मास्टर च्या वापरामुळे पडलेला फरक प्रत्यक्षदर्शनी शेतकऱ्यांना दाखवून देण्यात आला. या सोबतच देहातच्या इतर उत्पादनांबद्दल आणि देहात किसान अप्लिकेशन विषयी देखील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले.
बूस्ट मास्टर चा वापर -
- याच्या वापरामुळे झाडाची वनस्पतिवृद्धी वाढते.
- यामुळे झाडांना मातीतील पोषकद्रव्ये शोषण्यास मदत होते.
- हे अजैविक ताण कमी करण्यास मदत करते आणि वनस्पतींमध्ये पोषक तत्वांचे प्रभावी वितरण वाढवते.
- हे झाडांच्या रंग आणि वाढीस प्रोत्साहन देते.
वापरण्याचे प्रमाण - 2 मिली प्रति लीटर फवारणीसाठी
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor