ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
शेतकऱ्यांवर लिंकिंगची सक्ती केल्यास थेट कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

खत विक्रेत्यांनी खताची विक्री करताना शेतकऱ्यांवर दुय्यम खत खरेदीचे बंधन करू नये, तसेच खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करून कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार (ता.२३) विविध कृषी विभागांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
24 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
