श्रावणाने वाढविला गुळाचा गोडवा
श्रावणामुळे गुजरात येथून मागणी वाढल्याने बिगर हंगामी गुळाच्या दरात क्विंटलला तब्बल ४०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या येथील बाजार समितीत येणाऱ्या गुळास क्विंटलला किमान ३७०० ते कमाल ४६०० रुपयापर्यंत दर मिळत आहे. बाजार समितीत एक ते दोन दिवसाला सहा ते सात हजार गूळ व्यांची आवक होत आहे. गेल्या सप्ताहापासून ही दरवाढ झाल्याने गूळ उत्पादकांत समाधान आहे. श्रावण महिन्यामुळे गुजरातमधून अचानक वाढलेली गुळाची मागणी आणि तेथील शीतगृहामध्ये गूळ शिल्लक नसल्याने व्यापाऱ्यांनी गुळाची खरेदी वाढवली. याचा सकारात्मक परिणाम येथील बाजार समितीत येणाऱ्या गुळावर झाला. सातत्यपूर्ण मागणी असल्याने पुढील एक महिना तरी गुळाचे भाव चांगले राहतील, अशी अपेक्षा बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor