तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Dec
Follow
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे दर्शन
कोल्हापूर, बेळगाव आणि सातारा जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक प्राण्याचे वास्तव्य आहे. दरम्यान व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अनेक वेळा दर्शन झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान पुन्हा एकदा वाघाचे दर्शन घडल्याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. प्रकल्पात लावलेल्या कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली कैद झाल्या असून, प्रकल्पात ठिकठिकाणी पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळून आली आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध आहे.
33 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor