तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला प्रारंभ

जिल्ह्यात या वर्षीच्या काजू हंगामास प्रारंभ झाला असून, बांदा येथे काजू बी ला प्रतिकिलो १५० रुपये दर मिळाला आहे. तेथील शेतकरी नितीन मावळणकर यांनी प्रथम काजू विक्रीचा मान मिळविला आहे. दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी काजू हंगाम लांबला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत अजूनही काजूला मोहोर येत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी फळधारणा होत आहे. मात्र जिल्ह्यातील बांदा, दोडामार्ग या भागांमध्ये पहिल्या टप्प्यात आलेल्या काजू मोहराची बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor