जनावरांच्या पोटात जंत होण्याची चिन्हे आणि लक्षणे (Signs and symptoms of stomach worms in animals)
जनावरांच्या पोटात जंत होण्याची चिन्हे आणि लक्षणे (Signs and symptoms of stomach worms in animals)
नमस्कार पशुपालकांनो,
जसे कोणत्याही पिकात कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास पीक उत्पादनावर परिणाम होतो, पीक कमकुवत होते तसेच, जनावरांच्या पोटात जंत असल्यास व शरीरावर डास, माश्या, ढेकूण असल्यास त्या जनावरांचा पूर्ण विकास होत नाही व जनावरे अशक्त राहतात. जनावरांच्या पोटात जंत होण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे पशुपालकांच्या उत्पन्नावर परिणाम करू शकते. आजच्या या लेखात आपण जनावरांच्या पोटात जंत होण्याची चिन्हे आणि लक्षणे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
जंत (Worm) कुठून येतात?
जंत हे परजीवी असतात, परजीवी हे दुसऱ्यावर अवलंबून असतात. म्हणजेच एखाद्या बाधित जनावराच्या शरीरातून, जंतांची अंडी शेणावाटे बाहेर पडतात. ही अंडी मातीत, गवतात, चाऱ्यात, गव्हाणीत, हौदातील तसेच साठलेल्या पाण्यात अशा बऱ्याच ठिकाणी सुप्तावस्थेत राहतात. चारा, किंवा पाण्या वाटे हे नवीन जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यांची वाढ सुरु होते.
जंतांचे वात्सव्य:
- जंतांचे कित्येक प्रकारे जनावरांच्या शरीरात वास्तव्य असते.
- काही जंत पोट, आतड्यात आणि यकृतात वास्तव्य करतात.
- जनावरांच्या पचनेंद्रियांमध्ये, पचन मार्गामध्ये, रक्तामध्ये सुद्धा जंत असू शकतात.
- जास्त वेळा आढळणारे जंत हे पचन मार्गामध्येचं असतात.
लक्षणे (Worm Symptoms):
- हे जंत अन्न घटक खातातच, त्याचबरोबरीने पोट व आतड्यातील त्वचेला इजा करतात.
- काही जंत आतड्याला चिकटून रक्ताचे शोषण करतात.
- यकृतातील जंत यकृताच्या पेशींचा नाश करून कालांतराने यकृत निकामी करतात.
- जंतांमुळे जनावरांच्या उत्पादनावर परिणाम जाणवतो.
- जंत पोट व आतड्याला इजा करतात. त्यामुळे अन्न पचन होत नाही. परिणाम स्वरूप तीव्र रक्तक्षय व अशक्तपणा जनावरांत दिसून येतो.
- याचबरोबरीने हगवण, सूज ही लक्षणे दिसतात. जनावराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
- शेणाला दुर्गंधी येते, जंत दिसून येतात.
- आतड्याच्या अंतर्त्वचेच्या जखमांमुळे जनावरास अतिसार होतो.
- भूक न लागणे, दूध उत्पादनात घट, पचनाच्या अडचणी, पोटदुखी अशी अनेक लक्षणे दिसून येतात.
- लहान वासरात व शेळ्या, मेंढ्यांच्या पिल्लांत रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, रक्तक्षय उद्भवतो, वासरांची वाढ होत नाही.
- रक्तशोषक प्रकारचे जंत असतील तर तीव्र रक्तक्षयामुळे वासरं मृत्युमुखी सुद्धा पडू शकतात.
- कालवडींची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते.
- वयात येऊनसुद्धा कालवडी माजावर येत नाहीत.
- गाई व म्हशींमध्ये देखील प्रजननक्षमता कमी होते व माजावर न येणे, गर्भधारणा न होणे व वारंवार उलटणे यांसारख्या तक्रारी दिसू लागतात.
उपाययोजना :
- पशुपालकांनी आपल्या भागात कोणत्या प्रकारचे जंत आहेत याची माहिती करून घ्यावी.
- जंतांचे प्रकार जाणून घेण्यासाठी आपल्या सर्व जनावरांच्या शेणाची तपासणी करून घ्यावी.
- जंतांचे प्रकार समजल्यावर त्यांच्या नियंत्रणासाठी व प्रतिबंधात्मक उपायांसाठी उपयुक्त व प्रभावी औषधे निवडणे व व्यवस्थापन करणे सुलभ होते.
- जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढवावी. जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर जंतांच्या वाढीला आळा बसतो. त्यांचे नियंत्रण होते. याकरिता जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा.
- जनावरांचे ऊन, थंडी व पाऊस यांपासून संरक्षण करावे. जेणेकरून जनावरांना वातावरणाचा ताण जाणवणार नाही.
- जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवणे व वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे.
- गावातील सर्वच पशुपालकांनी एकाचवेळी जंत निर्मूलन मोहीम राबवावी. त्यामुळे शेणाद्वारे चराई जमिनीवरील पडणाऱ्या जंतांच्या अंड्यांची संख्या कमी होईल, त्यामुळे पुन्हा-पुन्हा नव्याने होणारी जंतबाधा थांबेल.
- पशुवैद्यकाच्या सल्ल्याने नियमित प्रभावी व परिणामकारक जंतनाशक औषधांचा वापर करावा.
आपण काय केले पाहिजे?
- जंतनिर्मूलन हा जंतांवरील उत्तम उपाय आहे.
- जंत झाल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करावेत. त्यापेक्षा चांगला उपाय म्हणजे, जंत होऊच नयेत, आणि त्यांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून वेळोवेळी जंतनिर्मूलन करावे.
पोटातील जंतांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures):
- जनावरांचा गोठा नियमितपणे स्वच्छ करा.
- ड्रेनेजची योग्य व्यवस्था करा.
- जनावरांचे शेण, मूत्र इत्यादी पसरू देऊ नका.
- जनावरांसाठी स्वच्छ अन्न व पाण्याची व्यवस्था करा.
डी-वर्मिंग (Deworming) कसे करावे ?
- जंताचे औषध जनावराच्या वजनानुसार द्यावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जंताचे औषध निवडून योग्य डोस द्यावा.
- प्रत्येक जंतनिर्मूलन करते वेळी वेगळे औषध वापरावे म्हणजे जंतांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होत नाही.
डी-वर्मिंग (Deworming) कधी आणि किती वेळा करावे?
- मोठ्या जनावरांना प्रत्येकी 3 महिन्यानंतर तर वासरांना जन्मल्यावर एक महिन्यानंतर 6 महिने होईपर्यंत प्रत्येक महिन्याला एकदा अशा प्रकारे जंतनिर्मूलन औषध द्यावे.
- जंतनिर्मूलन प्रभावी होण्यासाठी, सर्व जनावरांना एकत्रच एकाच वेळी औषध पाजावे, म्हणजे जंतांच्या टोळीचा जास्त चांगल्याप्रकारे नायनाट होईल.
खास काळजी:
प्रत्येकवेळी वेगळे औषध द्यावे म्हणजे त्या औषधांविरोधी प्रतिकारशक्ती जंतांमध्ये तयार होत नाही.
जंतनिर्मूलनाचे फायदे (Benefits of Deworming)
- वासरांची योग्य वाढ होते.
- जंतांमुळे दुधात होणारी घट टाळता येते.
जनावरांना जंतनाशक देण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात:
- जनावरांच्या पोटातील जंत मारण्यासाठी औषध देण्यापूर्वी त्यांच्या शेणाची तपासणी करून घ्यावी.
- सामान्यत: नवजात जनावरांच्या जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यात पशुवैद्य जंतनाशक देण्याची शिफारस करतात.
- यानंतर 6 महिन्यांपर्यंत जनावरांना महिन्यातून एकदा जंतनाशक द्यावे.
- 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या जनावरांना दर 3 महिन्यांच्या अंतराने जंतनाशक द्यावे.
- औषधाच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्यावी.
- जनावरांना त्यांच्या शरीराच्या वजनानुसार आहार द्यावा.
- तेच औषध पुन्हा-पुन्हा देण्याऐवजी औषधे बदला.
- एकच औषध वारंवार दिल्याने जंत त्या औषधासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करतात.
जनावरांच्या पोटात जंत होण्याची कोणती चिन्हे आणि लक्षणे तुमच्या जनावरांमध्ये दिसून आली आणि तुम्ही काय उपाय केले? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. जनावरांच्या पोटात जंत आहेत हे कसे कळेल?
अन्न पचन होत नाही, तीव्र रक्तक्षय, अशक्तपणा याचबरोबरीने हगवण, सूज, अतिसार, दूध उत्पादनात घट अशी अनेक लक्षणे दिसून येतात.
2. डी-वर्मिंग म्हणजे काय?
डी-वर्मिंग म्हणजे जंतनिर्मूलनाची प्रक्रिया.
3. डी-वर्मिंग कधी आणि किती वेळा करावे ?
मोठ्या जनावरांना प्रत्येकी 3 महिन्यांनंतर तर वासरांना जन्मल्यावर एक महिन्यानंतर 6 महिने होईपर्यंत प्रत्येक महिन्याला एकदा अशा प्रकारे जंतनिर्मूलन औषध द्यावे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor