ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Apr
Follow
समस्याग्रस्त ऊसशेतीवर केळी ठरली पर्याय
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी, फताटेवाडी, होटगी यासह अक्कलकोटच्या आंदेवाडी, केगाव, नागणसूर या ऊस पट्ट्यात अलीकडे निर्माण झालेली पाण्याची समस्या, उसाची घटणारी उत्पादकता, उसाला मिळणारा दर आणि त्याचाही असलेला बेभरवसा याचा विचार करून पारंपरिक पद्धतीने ऊस पिकविणाऱ्या या भागातून सुमारे 400 शेतकऱ्यांनी एकत्रित येत गेल्या तीन-चार वर्षांपासून केळीचा पर्याय निवडला आहे. आज या भागात तब्बल 225 एकरपर्यंत केळीचे क्षेत्र विस्तारले आहे, शिवाय गुणवत्तापूर्ण, दर्जेदार उत्पादनामुळे निर्यातीतही शेतकऱ्यांनी आघाडी घेतली आहे.
60 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor