तपशील
ऐका
योजना
शेतकरी योजना
DeHaat Channel
3 Aug
Follow

मृदा आरोग्य कार्ड योजनेचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया - महाराष्ट्र (Soil health card scheme has many benefits, know application process - Maharashtra)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी भारत सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे मृदा आरोग्य कार्ड योजना, जी दुर्बल आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. शासनाच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मातीची चाचणी करून त्याआधारे अहवाल तयार करून शेतकऱ्यांना दिला जातो, जेणेकरून शेतकऱ्यांना गुणवत्तेच्या आधारे पिकांची लागवड करून अधिक नफा मिळू शकेल. केंद्र सरकारने ही योजना 19 फेब्रुवारी 2015 रोजी सुरू केली, ज्यामध्ये आतापर्यंत देशभरातील हजारो, लाखो शेतकरी सामील झाले आहेत आणि त्यांना लाभ मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयीची अधिक माहिती.

माती परीक्षण म्हणजे काय?

माती परीक्षण हे एक वैज्ञानिक विश्लेषण आहे जे मातीच्या रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्मांचे मूल्यांकन करते.

माती परीक्षण कशाप्रकारे केले जाते?

  • शासनाच्या या योजनेंतर्गत कृषी अधिकारी शेतातील मातीचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवतात. जिथे शास्त्रज्ञांद्वारे मातीचे नमुने तपासले जातात.
  • काही दिवसांनंतर, मातीचा अहवाल तयार केला जातो आणि ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केला जातो, जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील मातीचा अहवाल कोणत्याही अडचणीशिवाय पाहता येतो.
  • याशिवाय काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मातीचा अहवालही छापून अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या घरी पाठवला जातो, जेणेकरून जे शेतकऱ्यांना ऑफलाइन अहवाल मिळू शकेल.

मृदा कार्डविषयीची माहिती:

  • केंद्र सरकारकडून दर तीन वर्षांनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिले जाते.
  • शेतातील मातीच्या गुणवत्तेच्या आधारे हे कार्ड मिळते जे तीन वर्षापर्यंत ग्राह्य धरले जाते.
  • हे एक प्रकारचे रिपोर्ट कार्ड आहे ज्यामध्ये मातीच्या गुणवत्तेशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध असते.

मृदा कार्ड काढण्यासाठीचे टप्पे:

  • सर्वप्रथम, शेतातील मातीचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात.
  • प्रयोगशाळेतील तज्ज्ञांकडून मातीची तपासणी करून मातीची सर्व माहिती घेतली जाते.
  • तपासणीनंतर मातीच्या नमुन्यातील उपलब्ध अन्नद्रव्ये आणि उपलब्ध नसणाऱ्या अन्नद्रव्यांची थोडक्यात बलस्थाने व कमकुवतता यांची यादी तयार केली जाते.
  • मातीतील अन्नद्रव्यांची कमतरता जाणून घेऊन सुधारणेसाठी सूचनांसह त्याची यादीही तयार केली जाते.
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या कार्डमध्ये असलेल्या शेतकऱ्याच्या नावाचा अहवाल एक-एक करून ऑनलाइन अपलोड केला जातो.
  • शेतकऱ्याच्या मोबाईलवरही याची माहिती मिळू शकते.

मृदा आरोग्य कार्डाचे फायदे:

  • शासनाच्या या योजनेद्वारे शेतकऱ्याला कोणत्या जमिनीवर शेती करून नफा मिळेल हे कळते.
  • या कार्डमध्ये शेतातील मातीत कोणते खत घालणे योग्य आहे हे देखील कळेल.
  • जमिनीतील पोषक तत्वांची उपलब्धता, कमतरता आणि संतुलित प्रमाण याबाबत योग्य व अचूक माहिती उपलब्ध होईल.
  • त्यामुळे खते, वेळ, यंत्रे, शेतातील मजूर यावर होणारा खर्चही कमी होऊ शकतो.

असे बनवा मृदा आरोग्य कार्ड:

  • https://soilhealth.dac.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुमचं राज्य सिलेक्ट करा.
  • राज्य सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉगिन फॉर्म उघडेल, ज्यामध्ये नवीन नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये युजर ऑर्गनायझेशन डिटेल्स, भाषा, युजर डिटेल्स, युजर लॉगिन अकाऊंट डिटेल्स इत्यादी भरावे.
  • सर्व माहिती नीट भरल्यानंतर ती सबमिट करावी, नोंदणी यशस्वी झाल्यानंतर लॉगिन करून होम पेजवर लॉगिन फॉर्म ओपन करावा.

मृदा आरोग्य कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती घरबसल्या मिळवायची असेल, तर सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येतो - 011-24305591 आणि 011-24305948. तसेच helpdesk-soil@gov.in वर ईमेल करून देखील माहिती मिळविता येऊ शकते.

तुम्ही मृदा आरोग्य कार्ड योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मृदा आरोग्य कार्ड योजना केव्हा सुरु करण्यात आली?

केंद्र सरकारद्वारे मृदा आरोग्य कार्ड योजना 19 फेब्रुवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली.

2. मृदा आरोग्य कार्ड योजनेसाठी अधिकृत वेबसाईट कोणती?

मृदा आरोग्य कार्ड योजनेची https://soilhealth.dac.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

3. मृदा आरोग्य कार्ड योजनेचे उद्देश काय?

शेतकऱ्यांना गुणवत्तेच्या आधारे पिकांची लागवड करून अधिक नफा मिळवा हे मृदा आरोग्य कार्ड योजनेचे उद्देश आहे.

33 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor