ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Nov
Follow
सोलापूर जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांना गाळप परवाने
राज्य शासनाने यंदाच्या ऊसगाळप हंगामासाठी कारखान्यांना १५ नोव्हेंबरपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांपैकी २० साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत. पण सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यातच जिल्ह्यातील सहा साखर कारखान्याचे चेअरमन प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने कारखान्याची यंत्रणा या कामात लागलेली आहे. तर अन्य काही चेअरमन, संचालक मंडळ इतर उमेदवारांच्या प्रचारात गुंतल्याने गाळप हंगामाला मतदानानंतरच २३ नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने गती येणार आहे.
38 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor