तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 July
Follow
सोलापूर, पुणे जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाच्या जलाशयात वाढ, ५० टीएमसी पाणीसाठी
सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बहुतेक उद्योगांना उजनी धरण वरदायिनी आहे. परंतु मागच्या वर्षभरातील दुष्काळाच्या स्थितीने उणे ६० टक्क्यांवर पहिल्यांदाच पोचलेल्या उजनी धरणात ५० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. ७ जून ते १७ जुलै या काळात उजनीत पावसाचे १९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. आता उजनी प्लसमध्ये येण्यासाठी आणखी २५ पावले पार करावी लागणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणामुळे साखर करखानदारी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. उजनी धरणातील ११७ टीएमसी पाणी मावते, पण त्यातील ८४ टीएमसीच पाणी दरवर्षी वापरण्याचे नियोजन ठरले आहे.
34 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor