सोयाबीन, कापूस उत्पादकांना ४१९४ कोटींचे अर्थसाह्य
खरीप हंगाम २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये अर्थसाह्य देण्यासाठी ४ हजार १९४ कोटी रुपये ६८ लाख रुपये देण्यास मान्यता देण्यात आली. यातील १५४८ कोटी ३४ लाख रुपये कापूस, तर २६४६ कोटी ३४ लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. मागील हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा अर्थसंकल्पी भाषणात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये, तर दोन हेक्टरच्या मयदित प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये या प्रमाणे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. या अनुदानासाठी ई-पीकपाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. ई-पीकपाहणी अॅप, ऑनलाइन प्रणाली आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही योजना केवळ २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मयदित असेल, असे शासन आदेशात म्हटले आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor