ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

किमान आधारभूत किंमत दराने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) यंदाच्या (२०२४-२५) खरीप हंगामातील सोयाबीनच्या विक्रीसाठी शुक्रवार (ता. १८) पर्यंत परभणी जिल्ह्यात २ हजार ९३० आणि हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६५७ मिळून एकूण ४ हजार ५८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या दोन जिल्ह्यात मंगळवार (ता. १५) पासून १८ सोयाबीन खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. परंतु सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. निकषाबाहेरचे सोयाबीन येत असल्यामुळे खरेदीसाठी अडचणी येत असल्याचे पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.
64 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
