तपशील
ऐका
पालक
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
30 Aug
Follow

पालकाची शेती (Spinach Farming)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

पालक हे औषधी गुणांनी युक्त असे भाजीपाला पीक असून व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन करून पालकाचे उत्पादन घेतल्यास चांगला फायदा मिळतो. पालक हे लोकप्रिय भाजीपाला पीक असून, या पिकापासून कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण पालक लागवडीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

पालक लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Soil for Spinach):

  • पालकाचे पीक हे विविध प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते.
  • ज्‍या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत त्या जमिनीतही पालकचे पीक चांगले येऊ शकते.

पालक लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Temperature for Spinach):

  • पालक हे हिवाळी पीक आहे.
  • पालक हे पीक अत्यंत कमी कालावधीत येते.
  • आपल्याकडे कडक उन्हाळ्याचे दोन महिने वगळता सर्व महिन्यांमध्ये पालक पीक घेता येते.
  • जास्त तापमानामध्ये पालकचे पीक घेऊ नये.

पालक लागवडीसाठी योग्य हंगाम (Suitable Season for Spinach):

खरीप हंगामातील लागवड जून - जूलैमध्‍ये आणि रब्‍बी हंगामातील लागवड सप्टेंबर - ऑक्टोबरमध्‍ये केली जाते.

पालक लागवडीसाठी सुधारित जाती (Spinach Varieties):

  • पालक ऑल ग्रिन पुसा ज्‍योती
  • पुसा हरित

पालकाची लागवड:

  • पालकच्या भाजीचा सतत पुरवठा करता यावा यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने बियांची पेरणी करावी.
  • पालक लागवडीसाठी सपाट वाफ्याचा वापर करणे फायदेशीर ठरते.
  • त्यानंतर बिया फोकून पेरणी करावी.
  • त्यानंतर बिया मातीत पेरून त्यावर हलके-हलके पाणी द्यावे.
  • दोन बियांमधील अंतर पंचवीस ते तीस सेमी ठेवावे.
  • दाट लागवड करू नये.
  • लागवड जर दाट झाली तर पिकाची वाढ पूर्णपणे होत नाही.
  • 10 ते 12 किलो बियाणे प्रति एकर लागते.

पालक पिकासाठी खत व्यवस्थापन:

  • पालक पिकासाठी नत्राचा पुरवठा जास्त प्रमाणात करावा लागतो.
  • जमिनीत ओलावा असणे गरजेचे असल्यामुळे नियमित पाण्याचा पुरवठा करावा.
  • पालक पिकासाठी जमिनीला जवळ-जवळ 20 गाड्या शेणखत, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश आणि 80 किलो नत्र देणे गरजेचे आहे.
  • शेणखत हे पूर्वमशागत करताना जमिनीत मिसळून द्यावे.
  • पालकच्या पानांना हिरवेपणा यावा आणि उत्पादनात चांगली वाढ व्हावी यासाठी बी उगवल्यानंतर पंधरा दिवसांनी आणि कापणीनंतर दीड टक्का युरिया फवारावा.

पालक पिकासाठी पाणी व्‍यवस्‍थापन:

  • पिकाला नियमित पाणी द्यावे.
  • हिवाळ्यामध्ये लागवड केली असेल तर पाणी देताना दहा ते पंधरा दिवसांचा गॅप द्यावा.
  • पिकाची काढणी करण्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर पिकाला पाणी द्यावे.
  • पालक बियांची लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावे.

पालकची काढणी:

  • पालक पेरणीच्या एका महिन्यानंतर पीक कापणीसाठी तयार होते.
  • कापणी करीत असताना खराब पालक वेगळा काढावा.
  • पालकची व्यवस्थित जुडी बांधून घ्यावी.
  • जुड्या व्यवस्थित जागेत ठेवून त्यावर कापड झाकून किंवा बांबूच्या टोपल्यात किंवा पोत्यात ठेवाव्यात.
  • टोपलीच्या खाली किंवा वर कडुनिंबाचा पाला ठेवला तर पालक लवकर खराब होत नाही.
  • पालकच्या जुड्यांवर जास्त प्रमाणात पाणी मारू नये अन्यथा पालक खराब होऊ शकते.

पालकचे उत्पादन:

  • 4 ते 6 टनपर्यंत एकरी उत्पादन मिळते.
  • तसेच बियाण्याचे उत्पादन दीड टन पर्यंत मिळू शकते.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार पालकची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या पालक पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पालक पिकासाठी योग्य जमीन कोणती?

पालकाचे पीक विविध प्रकारच्‍या जमिनीत घेता येते. ज्‍या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत त्या जमिनीतही पालकचे पीक चांगले येऊ शकते.

2. पालक पिकासाठी महाराष्ट्रातील योग्य हंगाम कोणता?

महाराष्‍ट्रात कडक उन्‍हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते.

3. पालक पिकात आढळून येणारे प्रमुख रोग कोणते?

पालक पिकात मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा व केवडा हे रोग प्रामुख्याने आढळून येतात.

41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor