तपशील
ऐका
योजना
शेतकरी योजना
DeHaat Channel
23 Nov
Follow

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना! (Subsidy scheme for export of agricultural produce by Sea!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- 2024 ही महाराष्ट्र शासनामार्फत विशेष शेतकरी घटकांसाठी राबवली जात आहे. या योजनेत नवीन इतर देशात समुद्री मार्गाने राज्यातील शेतकरी यांनी शेतात पिकवलेल्या मालाची(फळे , भाज्या) निर्यात करण्यासाठी परिवहन साह्यता योजना सुरु केली आहे. सदर योजनेमध्ये देशात विहित केलेल्या कृषी मालाची समुद्र मार्गाने निर्यात करतील अशा शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार हे रु 50,000/-प्रती कंटेनर (20 फुट /40 फुट) इतक्या अनुदानास पात्र असतील. तसेच प्रती लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान 1 लाख रुपये इतके देण्यात येणार असून त्याकरिता योजनेचे नियम व अटी, लागणारी कागदपत्रे, मंजूर देश आणि मंजूर असणारा माल इत्यादिबाबत सविस्तर माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

योजनेचा उद्देश:

शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे व कृषी मालाच्या निर्यातीत वृद्धी करणे. तसेच निर्यातीस जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळवून देणे.

योजनेचे नियम व अटी:

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- 2024 सदर योजनेंतर्गत परिवहन सहाय्य अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील नियम आणि अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही अटी व नियम पूर्ण करणे बंधनकारक असतील ते कोणते आहेत ते खालीलप्रमाणे पाहूया.

  • महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादन महामंडल, कंपनी, निर्यातदार इत्यादी सदर योजनेसाठी पात्र ठरतील.
  • महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादन महामंडल, कंपनी, निर्यातदार इत्यादीनीं सागरी मार्गाने कन्टेनर द्वारे शेतमालाची थेट निर्यात करणे आवश्यक आहे .
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर कृषी पणन मंडळाकडे पूर्व संमती करिता अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेसाठी संबधित अर्जदाराने दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा तसेच कंटेनर पुरवठादार फर्मच्या पावत्यांसह इतर सर्व संबधित कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील .
  • कृषी मालाचा नमुना पाठविण्याकरिता सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • माल हा गुणवत्तापूर्ण असावा. माल गुणवत्तापूर्वक नसेल तर शेतकरी अथवा इतर संबधित निर्यातदार अपात्र ठरतील.
  • पूर्व संमती प्राप्त झालेले लाभार्थी यांनी निर्यात केल्या मालाची विक्री रक्कम प्राप्त झाल्यानंतरच योजनेकरिता प्रस्ताव सादर करू शकतील, जेणेकरून गुणवत्ते अभावी मालाची विक्री रक्कम प्राप्त न झाल्यास अशा प्रस्तावनांना अनुदान देय होणार नाही.
  • सदर योजनेमध्ये पुढे नमूद केलेलय देशात विहित केलेल्या कृषी मालाची समुद्र मार्ग निर्यात करतील अशा शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, फर्म सहकारी संस्था, निर्यातदार यांना रु 50,000/- प्रती कंटेनर (20 फुट /40 फुट) इतक्या अनुदानास पात्र असतील.
  • तसेच प्रती लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान १ लाख रुपये इतके असेल.

निर्यात करण्यासाठीचे देश आणि मालाचा प्रकार:

  1. युएसए: आंबा, डाळिंब
  2. ऑस्टेलिया: आंबा, डाळिंब
  3. दक्षिण कोरिया: केळी, आंबा
  4. कझाकिस्थान: आंबा
  5. अफगाणिस्थान: केळी, कांदा
  6. इराण: केळी, मंडारीन, आंबा
  7. रशिया: केळी, आंबा
  8. मॉरिशस: आंबा, कांदा
  9. लाटविया (रेगा पोर्ट मार्गे): भाज्या, कांदा
  10. युरोपियन संघ: आंबा, डाळिंब
  11. कनाडा: आंबा, डाळिंब
  12. सर्व देश: संत्री

वरील यादीनुसार नमूद सर्व देशांबरोबर वरील प्रमाणे मालाची निर्यात करू शकतो.

आवश्यक कागदपत्रे:

  • दिलेल्या अर्जाच्या स्वरुपात विहित नमुन्यात लेखी अर्ज करणे.
  • ईनव्हाईस कापी
  • शिपिंग बिल
  • कंटेनर भाडे पावती
  • परकीय चलन जमा करणारे बँक प्राप्ती प्रमाणपत्र किंवा बँक एन्ट्री पुरावा.
  • वरील सर्व संबधित कागदपत्रे निर्यातदारांनी त्यांचे प्रस्ताव MSAMB च्या विभागीय कार्यालयांना सादर करणे आवश्यक असेल.

लाभाचे स्वरूप:

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- 2024 कृषी मालाची समुद्र मार्ग निर्यात करतील अशा शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार हे रु 50,000/- प्रती कंटेनर (20 फुट / 40 फुट) इतक्या अनुदानास पात्र असतील. तसेच प्रती लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान 1 लाख रुपये इतके असेल.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजनेचे उद्देश काय?

शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे व कृषी मालाच्या निर्यातीत वृद्धी करणे. तसेच निर्यातीस जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळवून देणे.

2. सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजनेसाठी कोण पात्र ठरेल?

महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादन महामंडल, कंपनी, निर्यातदार इत्यादी सदर योजनेसाठी पात्र ठरतील.

3. सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजनेसाठी किती लाभ मिळेल?

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- 2024 कृषी मालाची समुद्र मार्ग निर्यात करतील अशा शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार हे रु 50,000/- प्रती कंटेनर (20 फुट /40 फुट) इतक्या अनुदानास पात्र असतील. तसेच प्रती लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान 1 लाख रुपये इतके असेल.

29 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor