पेरूमध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे आणि व्यवस्थापन (Symptoms and management of nutrient deficiencies in Guava)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
पेरू हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात होणारे मध्यम आकाराचे पीक आहे. पेरू ही भारतातील लोकप्रिय व्यावसायिक शेती आहे. हे सहज वाढणाऱ्या झाडांपैकी एक आहे ज्याला जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नसते आणि हे चांगले उत्पन्न देण्यास देखील सक्षम असते. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या भागात पेरूची व्यावसायिक शेती केली जात असून, महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे 10,000 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, बुलढाणा, भंडारा, जळगाव हे प्रमुख पेरू उत्पादक जिल्हे आहेत. पेरू पिकाला वाढीसाठी (Plant Growth) आणि तग धरण्यासाठी व विविध पोषक तत्व लागतात. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे पिकाचे नुकसान होते. आजच्या या लेखात आपण पेरूमधील पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
पोषक तत्व म्हणजे काय?
वनस्पतीमधील पोषक तत्व म्हणजे वनस्पतीला त्याच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थाचा संदर्भ असतो. वनस्पतींना, सर्व सजीवांप्रमाणेच, आवश्यक कार्ये पार पाडण्यासाठी विविध पोषक तत्वांची आवश्यकता असते. ही पोषकतत्त्वे माती, हवा आणि पाण्यातून मिळतात. वनस्पतींसाठी प्राथमिक पोषक घटकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते:
मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स.
- पिकांना अधिक प्रमाणात लागणारे पोषक घटक (बृहत्/मॅक्रोन्यूट्रिएंट्स)
- पिकांना अत्यंत कमी प्रमाणात लागणारे पोषक घटक (सूक्ष्म/मायक्रोन्यूट्रिएंट्स) - यांची गरज झाडांना थोड्या फार कमी प्रमाणात लागते.
पोषक घटकांचे वर्गीकरण:
बृहत् अन्नद्रव्ये (मॅक्रो न्यूट्रिएन्टस)
अ. अखनिज अन्नद्रव्ये - कार्बन (C) , हायड्रोजन(H), ऑक्सिजन (O)
ब. प्राथमिक अन्नद्रव्ये - नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K)
क. दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शिअम (Ca), मॅग्नेशिअम (Mg), गंधक(S)
सूक्ष्म अन्नद्रव्ये (मायक्रो न्यूट्रिएन्टस)
लोह (Fe), मंगल (Mn), जस्त (Zn), बोरॉन (B), मोलाब्द (Mo), तांबे (Cu), क्लोरिन (Cl), निकेल (Ni)
या प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकाच्या शरीरक्रियेमध्ये एक विशिष्ट कार्य असून, पिकांना त्यांची गरज कमी अधिक प्रमाणात भासते.
पेरूमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि झिंक सारखी खनिजे असतात. पेरू फळाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी ही सर्व खनिजे म्हणजे पोषक तत्वे महत्वाचे कार्य करतात.
आता जाणून घेऊयात या पोषक तत्वांच्या कार्याविषयी:
फॉस्फरस (स्फुरद):
- मुळांच्या वाढीसाठी आवश्यक.
- वनस्पतीला शक्ती प्रदान करते.
- फांद्या, फूल, फळ, प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि एकूणच वनस्पतीच्या वाढीसाठी प्रोत्साहन देते.
फॉस्फरसच्या कमतरतेची लक्षणे:
- कमतरतेची लक्षणे जुन्या परिपक्व पानांवर दिसतात.
- पाने लांबट, हिरवट होऊन, पानांची मागील बाजू जांभळी छटायुक्त होते.
- पाने कमी लागतात व त्यांचा आकार कमी होतो.
- मुळांची वाढ खुंटते.
व्यवस्थापन:
- मोनो अमोनियम फॉस्फेट 12:61:00 (देहात न्यूट्री वन - MAP) 75 ग्रॅम किंवा
- मोनो पोटॅशिअम फॉस्फेट 00:52:34 (देहात न्यूट्री वन - MKP) - 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
पोटॅशियम (पालाश):
- वनस्पतीला पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती प्रदान करते.
- वनस्पतीला कीड-रोग तसेच अन्य जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची शक्ती देते.
- पर्णरंध्राचे नियमन करून बाष्पोत्सर्जनाचे नियंत्रण करते.
- पोषक द्रव्ये आणि साखरेचे वहन करते.
- वनस्पतीच्या खोडांना ताठरता प्रदान करते.
पालाशच्या कमतरतेची लक्षणे:
- कमतरतेची लक्षणे जुन्या पानांवर दिसतात, ज्यामध्ये पानांच्या कडा व टोके अगोदर पिवळसर पडतात.
- नंतर या कडा तांबूस होऊन, पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
- खोड कमकुवत होते व शेंडे गळून पडतात.
- फळांची गुणवत्ता बिघडते.
व्यवस्थापन:
- पोटॅशिअम नायट्रेट 13:00:45 (देहात न्यूट्री वन - KNO3) - 75 ग्रॅम किंवा
- पोटॅशिअम सल्फेट 00:00:50 (देहात न्यूट्री वन - SOP) 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
- झाड लहान असल्यास 00:00:50 वापरू नये.
लोह:
- हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक.
- बरीचशी विकरे आणि अमिनो आम्लांच्या निर्मितीमध्ये मदत करते.
लोहाच्या कमतरतेची लक्षणे:
- लोहाच्या कमतरतेमुळे पानांत पुरेसे हरितद्रव्य तयार होत नाही, त्यामुळे नवीन येणारी कोवळी पाने पिवळसर दिसतात व नंतर गळून पडतात.
लोहाच्या कमतरतेचे व्यवस्थापन:
शेणखतासोबत फेरस सल्फेट (कात्यायनी) 5 किलो प्रति एकरी द्यावे. इंस्टाचील फेरस (चिलेटेड फेरस) 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे.
मँगनीज :
- हरितद्रव्यांचा अविभाज्य भाग.
- पानांना गडद हिरवा रंग प्रदान करणे.
- वनस्पतींमध्ये मेद, कर्बोदके व जीवनसत्त्वे तयार करण्यासाठी मदत करणे.
- नत्र, स्फुरद व गंधकाच्या शोषणासाठी वनस्पतीला मदत करणे.
मँगनीज कमतरतेची लक्षणे:
- पिकांच्या पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा, नंतर पांढरट व करडा होतो.
- कोवळी पाने फिकट पिवळसर दिसून येतात.
व्यवस्थापन:
शेणखतासोबत मॅंगेनीज सल्फेट (देहात न्यूट्री वन - MgSO4) 5 किलो प्रति एकरी द्यावे.
इंस्टाचील मॅंगेनीज (चिलेटेड मॅंगेनीज) 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे.
झिंक (जस्त):
- वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक संप्रेरकांची निर्मिती करणे.
- विविध विकरे, प्रथिनांच्या संश्लेषणासाठी मदत करणे.
झिंक कमतरतेची लक्षणे:
- पानांचे आकारमान कमी होते.
- पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते.
- कळ्या सुरकुतलेल्या असतात.
व्यवस्थापन:
- शेणखतासोबत झिंक सल्फेट (देहात न्यूट्री वन - ZnSO4) 5 ते 7 किलो प्रति एकरी द्यावे.
- इंस्टाचील झिंक (चिलेटेड झिंक) 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून स्प्रे करावा.
तुमच्या पेरू पिकात पोषक तत्वांच्या कमतरतेची कोणती लक्षणे दिसून येतात? आणि तुम्ही काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. पिकांना पोषक तत्वे वेळीच उपलब्ध न झाल्यास काय होते?
पिकाच्या उत्तम वाढीसाठी लागणारी पोषक तत्वे वेळीच उपलब्ध न झाल्यास पिकांच्या अंतर्गत शरीरक्रिया व्यवस्थित चालत नाहीत.
2. पेरू पिकात आढळणारी मुख्य पोषक तत्व कोणती?
पेरूमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि झिंक सारखी खनिजे असतात. पेरू फळाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी ही सर्व खनिजे म्हणजे पोषक तत्व महत्वाचे कार्य करतात.
3. महाराष्ट्रातील प्रमुख पेरू उत्पादक जिल्हे कोणते?
महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, बुलढाणा, भंडारा, जळगाव हे प्रमुख पेरू उत्पादक जिल्हे आहेत.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor